Jump to content

पान:अशोक.pdf/216

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कुणबी. १९५ परस्परसहकारी मंडळ्यांचा मुख्य फायदा हा कीं, कुणबी, हलके धंदेवाले व मजूर ह्यांना सावकारापेक्षां हलक्या व्याजानें कर्ज मिळतें, जमाखर्चात भोळे राहत नाहीं, व लुचेगिरी होत नाहीं. सावकारी कर्जाचें व्याज सावकार आणि तगाईचें व्याज सरकार घेतें. तें कांहीं परत गांवक-यांच्या घरांत जात नाहीं. पतपेढीच्या व्याजाची गोष्ट तशी नाहीं. तें सहकारी मंडळीच्या सभासदांच्या म्हणजे रयतेच्या पदरांत पडतें. तिची संपति वाढते म्हणजे कर्ज मिळाल्यानें गरज भागते आणि पुन्हा त्याचा नफाही खावयास सांपडतो. तगाई मिळण्यास पाटील-कुळकर्णी, जामीनदार यांचे जाबजबाब, मुलकी आधिका-यांची चैौकशी वगैरे गोष्टींमुळे कालावधि लागतो. त्वरित पैसा पाहिजे असल्यास तगाईनें वेळ मारून नेतां येत नाहीं. पुष्कळ प्रसंगीं वेळ निघून गेल्यावर तगाई भेटते. पैसा। पाहिजे असतो आज व तगाई मिळणार महिना पंधरा दिवसांनीं. तेव्हां कित्येक वेळां भारी व्याज कबूल करून लोक पैसा काढतात, आणि तगाई मिळाल्याबरोबर तो चुकवितात. पतपेढीचा पैसा मिळण्यास इतकी दिरंगाई लागत नाहीं. तगाई कोणत्या कामांसाठीं घ्यावयाची तीं कामें ठरली आहेत. त्यांखेरीज इतर कामासाठीं तगाई मिळत नाही. पतपेढीची गोष्ट तशी नव्हे. ज्या कामासाठीं तगाई मिळत नाहीं अज्ञा अनेक योग्य कामांसाठी पतपेढीला आपल्या सभासदांना कर्ज देतां येतें. पुरातन काळापासून सावकार आणि कुळे ह्यांचें नातें सेव्य-सेवकाचें होऊन बसलें आहे. त्यामुळे सावकारांत अरेरावी व जुलूम, कुळांमध्यें मॅिधेपणा व गुलामगिरी, आणि दोघांमध्येंही कपटाचरण शिरलें आहे. दुसरें असें कीं, जो तो आपल्या पायापुरतें पाहतो, एकंदर गांवाच्या किंवा समाजाच्या हिताकडे लक्ष देऊन वर्तन करीत नाहीं. त्यामुळे 'हलवायाच्या घरावर तुळशीपत्र ? ठेवण्याची बेजबाबदार खोड आपल्या लोकांना लागली आहे. एकाद्याला जर कोणाकडे कर्ज काढावयाचें असलें आणि कर्ज देणारानें जर विचारलें कीं, असामी कशी आहे, तर कर्ज घेणारा वाईट असला तरी आपले शब्दानें न्याचें काम होत अस