Jump to content

पान:अशोक.pdf/198

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कुणबी. ?ᏙᏕᎲ आहे. आमच्यांत जे धनवान् झाले ते कुणाबकीवर झाले नाहींत. रोज गारधंदा, व्याजबद्वा, व्यापार करूनच त्यांनीं धनसंचय केला. “ दर्याची माती दर्याला आटते ? ‘ बासा न राह और कुत्ता न खाये, ’ असें कुणबी आजवर म्हणत आला आहे; आणि ओढगस्तपणाच्या दुर्गुणांना तो बळी पडला आहे. 'कुणबीका बेटा और गहूंका आटा, पिटा उतना मिठा,” असें सर्वीच्या अनुभवास येतें. ज्या कारूनारूंवांचून नडतें, अथवा जे कारूनारू अगर भिकार लोक बळजेोरी किंवा नुकसान करतील अशी भीति असते, त्यांची भरती कुणबी मनसेक्ति करतो. जेथें चाळ्याचिपळ्या करून निभण्यासारखे आहे, किंवा ज्यांचें भय बाळगण्याचें कारण नाहीं अशा.हूकदाराचें काम घेऊनही त्याच्या तोंडाला पानें पुसण्याला तो कमी करीत नाहीं. त्यानें कधीही सावकाराचा धाक धरला नाही; व देण्याची पर्वा केली नाहीं. त्यामुळे देणें देण्याच्या कामी कुणबी हातचा फार जड झाला आहे. कुणब्याकडून सारा वेळेवर येण्याची खात्री असती, तर शेतमाल किफायतीनें कुणबी विकीपर्यंत सरकार थांबतें, आणि पट्टीच्या हप्त्याच्या तारखा त्यापूर्वी नेमतेंना. कुणव्याशीं व्यवहार निभड मारवाडयांनींच करावा असें म्हणून दक्षिणी सावकारांनीं तोंड फिरविलें, व मारवाडी आतां म्हणतात कीं, कडव्या रोहिल्यांची सावकारी खरी. जसें ज्याचें नेट किंवा लुच्चेगिरी तसा कुणब्याजवळून पैसा निघतो. थापडवाईक सावकाराला किंवा जमीनदाराला कुणबी कुळे चांगलाच झोका देतात. रोख खेड कबूल न करतां त्यांच्या जमिनी ते बटाईनें ( वांट्यानें ) घेतात. ‘बटाई म्हणजे लुटाई.? शक्यू तितकी मेहनत ते आपल्या स्वतःच्या शेतांत करून फावला वेळ बटाईच्या शेताकडे लावतात, आणि स्वतःच्या शेतावरीलसुद्धां खर्चाच्या सर्व बाबी दुस-याच्या शेतावर घालतात. उदाहरणार्थ, बटाईच्या शेतांत गुरें चारण्यासाठीं पडीत जास्त टाकावयाचें, त्यांत कोंब फुटल्यापासून तीं पार खळे संपेपर्यंत आपले बैल चारावयाचे, धान्या हुरडयावर आलें कीं, घरच्या सर्व माणसांचें व पै-पाहुण्यांचे पोट त्यावर' ዓ ቕ