Jump to content

पान:अशोक.pdf/192

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

কৃতাৰ্নী, F\GF राचें आहे. शेणकुराचें मुबलक खत मिळण्याला पुष्कळ लक्ष्मी उर्फ गुरें बाळगलीं पाहिजेत. तीं सर्व शेताच्या मालावर जोगवणें अशक्य.

  • घरचा चारा आणि रानचा वारा' बरोबर नाहींत असें म्हणतात. इतक्या गुराढोरांना तोंड घालण्याला मोकळे जंगलच पाहिजे. शेतीला कुंपण काँटेरी झुडपांचें असतें. तीं सर्व वहिती जमिनींत मिळत नाहींत. तीं जंगलांतून आणिलीं पाहिजेत. जंगलाशिवाय पुरेसें सरपण कोठे सांपडणार ? महारांचें काम जमेदारांना जळण पुराविण्याचें होतें, व त्याबद्दल त्यांना भाकर किंवा जेवण मिळे. गुन्हाळांत चुलांगणाला महारानें सरपण पुरवावें व त्याबद्दल त्याला ऊंस, दोन ढेपा गूळ व शेवटचें आधण मिळतें. हें सरपण जर मालकाच्या शेताचेंच असतें तर महाराचा हक इतका मोठा नसता. अर्थात महारांना काय आणि इतरांना काय जंगलांतून सरपण घेण्याची मनाई नव्हती. वारली, कातकरी वगैरे जंगली जाती · जंगलांत जाऊन सरपण, गवत आणणें, जंगलांतील कंदमुळे खाणें ? असा आपला धंदा अजून सांगतात. त्याचप्रमाणें उTजमितीला पहाडाचे आसपासचे शेतकरी व मजूर आपले घरांतला दाणा वाढला (संपला) म्हणजे जंगलांत जातात; व झाडपाला, फळे, कंद आणून खातात. रासमाथ्याला बलुत्येआलुत्ये आणि अठरापगड र्मिकार हक म्हणों कीं भीक म्हणा मागून आज हजारो वर्षे आपली सालबेगमी करून ठेवीत आहेत. कुणब्याला जर काळी इतकी कमी असतीं कीं, तिच्यांतून त्याची स्वतःची सालबेगमी निघणें दुरापास्त, तर ह्या वहिवाटीला कांहीं तरी आळा घालण्याचा प्रयत्नाः ती करता. भिका-यांच्या टोळधाडींमुळे आपल्या पोटावर पाय पडतो असें बलुत्याआलु,त्यांना आढळतें तर निदान ते तरी त्यांना आडवे होते. ह्या सर्वे गोष्टीवरून असं स्पष्ट होतें की, कुणबी थोडा व काळी फार असल्यामुळे बळीराजानें दुनियेचा भार उचलला. त्यानें वाटेल तेथें वाटेल तितकी काळी काढावी व पिकवावी, तिच्या साठीं लागल तो रानमाल उपसावा आणि हवी तितकी लक्ष्मी बाळगावी,