Jump to content

पान:अशोक.pdf/191

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

দুখীৰ্ব্বস্তািন্ধ আঁক্তিত্বই ** * エ -2G <CH कुणबिकीचीं अवजारें, जनावरें, खताचे प्रकार, शेतकुंपणें, कुणबी पोशीत असलेले बलुत्येआलुत्ये व भटक्ये यांची संख्या इत्यादींचा विचार केला ह्मणजे आमची कुणबीक उमाप रानाच्या उदंड भरंशावर थाटली असावी अशी पाकळी बसते. 'जातीजातींचे चाळे” वर्णन करितांना तुकोबांनीं ‘ हेकड कुणबी वाटा मोडी ” असें म्हटलें आहे. अव्वल इंग्रजींतल्या मराठी शाळेत शिकलेल्या एका ऍशी उलटलेल्या गृहस्थानें त्या वेळचा नीतिपाठ म्हणून दाखविला; तेव्हां ‘ज्यानें त्यानें आपली जमीन वहीत करावी, आपल्या जमिनीबाहेर वहीत करू नये,' अशी त्यांतील एक नीति त्यानें म्हणून दाखविली. यावरून हें उघड होतें कीं, पडितांत तर कुणबी नांगर फिरवीच पण वाटा मोडून देखील तो कोठंही रान काढून वहीत करी. मुसलमानी व मराठी अमलांत जरी गांवची पहाणी होऊन मिरासदार, उपरी व त्यांच्या जमिनी ठरून गेल्या होत्या, तरी सुद्धां कमाल आकार बांधून काळी-पांढरी गांवचे दिमतीस दिल्यामुळे गांवांतल्या एखाद्या कुणब्याला काळी आजिबात नसली किंवा त्याच्या खटल्याला नेिपुर आली तर गांवकरी दुस-याच्या शेतांतून त्याला हरप्रयत्नानें जमीन मिळवून देत आणि त्याची व त्याच्या मुलाबाळांची बेबुदी करीत. पूर्वीच्या राजवटींत दर्याची व जंगलची अटक सैल होती, आणि समुद्र व रान ह्यांवर सरकारी जाबता नव्हता असें म्हटलें तरी चालेल. नांगरापासून तों उंसाच्या चरकापर्यंत बहुतेक शेतीचीं हत्यारें व सनगें लांकडी आहेत, आणि तीं नवीन किंवा दुरुस्त करितांना कुणब्याला सुतारलेोहारांला लांकूडसरपण पुरवावें लागतें. कारूनारूंच्या हत्यारांतही इतर जिनसांपेक्षां लांकडाचा स्वप अधिक दिसून येते. तेव्हा सर्वांनाच लांकडाचा पुरवठा पुष्कळ आणि थोडक्यांत मिळण्याची सोय असली पाहिजे. सर्वत्र मुख्य खत गोव