दुकानद्वारी. १६५ घेतल्याशिवाय त्यानें वसूल कां द्यावा? खेड्यांतील उदमी म्हणजे लोकांचे सराफ, आडत्ये आणि आप्त होत. लोकांचें सुखदुःख, गरिबीहरिपी प्रहर रात्रीला कोणाला गरज लागली तर त्यांच्याकडेच गेलें पाहिजे. आपला माल दूर देशीं नेऊन विकणें खेडवळांना शक्य नसतें. तो ते बहुतेक गांवचे वाण्यांनाच घालतात. खेड्यांतले बहुतेक लोक त्यांचे देणेदार असतात. हें सर्व मनांत आणून ते जर कुंकून खातील तर त्यांचाही धंदा चालेल, आणि लोकांनाही तकवा राहील. देशांत व्यापारवृद्धि झाल्यामुळे अलीकडे खेड्यांतील मोठमोठ्या व्यापा-यांनीं शेतक-यांशीं व्यवहार आंखडता घेतला आहे; आणि ते आपलें भांडवल, आडत, जवाहीर, गिरण्या वगैरे सारख्या व्यापारांत घालू लागले आहेत. परंतु झटपट श्रीमंत होण्याची हांव जर उदमी आंवरून धरतील, आणि रास्त नफा ठेवून धंदा करतील, तर खेड्यांची स्थिति सुधारून त्यांच्या भराभटीचे तेही संपति अनंतरूपांनीं व्यापा-यांच्या घरांत शिरोते. तसेंच हे लोक जर चोख हिशेब ठेवतील, तर त्याच्या व्यवहारासंबंधानें जिकडे तिकडे जें संशयाचें काहूर उठलें आहे तें खात्रीनें कमी होईल. पिकें खैडून घेणाज्या देशी परदशा व्यापान्याच्या व्यवहाराबद्दल जरूर विचार केला पाहिजे. ह्यांन द्रव्यबल व माणूसबल असल्यामुळे ह्यांच्या केवळ फूत्कारानें शेतकल्यांना कमांत कमी चौथाईला मुकावें लागतें. ही गोट कांहीं लहानसान नव्हे. ह्याबद्दल लोकांत विचारजागृति होऊं लागली आहे, आणि हे व्यापारी प्रतिष्ठित असल्यामुळे ह्या बाबतींत उभयतांमध्यें फायदेशीर व सरळपणाचा मार्ग निघण्याची आशा आहे. पण ज्यांकडे डोळेझांक कणें आत्मघाती आहे, अशुा पुष्ट्रण व पंजाबी व्यापायांबद्दल काळजीपूर्वक विचार चालू असल्याचें ऐकिवांत नाहीं. मराठशाहींतल्या पडत्या काळांत जिकडे तिकडे गृहकलह माजला, आणि संस्थानिक व सरदार ह्यांस आप्तांचा देखील भरेंसा येईनासा झाला;
पान:अशोक.pdf/186
Appearance