दुकानदारी. १५५ परिणाम असा घडून येतो कीं, गांवढेक-यांचें खातें पिढ्यानुपिढ्या बेबाक होत नाहीं. मोठे दुकानदार किरकोळ दुकानदारांप्रमाणें अधीर होत नाहींत, आणि गि-हाइकांची नड जाणून ती वेळेवर भागवितात. ह्यामुळे गि-हाइकावर त्यांची छाप चांगली असते. एकंदरींत हिंग बोजवार विकणा-यांपेक्षां भरण्याचे दुकानदार गि-हाइकांशीं वागण्यांत जरी प्रतिठित असले तरी सचेोष्टीनें वागून गि-हाइकाचा फायदा करावा अशी भावना त्यांमध्यें कश्चित आढळून येते. तांब्याशिवाय चांदी नाद धरीत नाहीं, तशी खोट्याशिवाय दुकानदारी चालत नाहीं अशी आमच्या वैश्यांची जुनाट समजूत आहे. म्हणून आमचे दुकानदार गि-हाइकांच्या डोळ्यांत धूळ टाकण्याला फार दिवसांपासून वहिवाटीनें बांधले गेले आहेत!! बनिया भिंतर बेसा सती । बगळा भगत कागा जती । ही उक्ति प्राचीन काळापासून लोकांच्या तोंडीं आहे. तरी पण सरडाची धांव अति झाली तर कुंपणापर्यंत असते. स्वराज्यांत कसब्यांचें व व्यापा-यांचें दळणवळण दूरदेशीं बेताबाताचें असल्यामुळे बहुतेक व्यापार स्थानिक असे; आणि हुन्नरी, व्यापारी व गि-हाईक हे एकमेकांची ओळख व मोहबत धरीत. त्या भेोळ्या काळांत ख-याखोट्याची भीति व अबूची चाड लोक अधिक बाळगीत. एकदां कां कानफाट्या नांव पडलें म्हणजे गि-हाईक लागणार नाहीं, व उपाशीं मरण्याची पाळी येणार; निदान चहूंकडे नाचकी होणार, हें हुन्नरी व दुकानदार जाणून होते; आणि देशांतरीं माल नेण्याचीं साधनें नसल्यामुळे हुन्नरी व व्यापारी लोकांना गि-हाइकी जतन करणें भाग पडे. खोट्याचें बेमालम खरें करून दाखविणारे, व नाना प्रकारच्या मिश्रणांची संपादणूक शक्य करणारे शास्त्रीय शोध आमच्या कसबी लोकांना ठाऊक नसल्यामुळे त्यांना मोठीशी व भानगडीची भेसळ किंवा लबाडी पचविण्याची आक्रमशात नव्हती. फारतर खोब-याच्या तेलांत थोडेसें करडीचें तेल, करडीच्या तेलांत थोडेंसें शेंगादाण्याचें तेल मिसळणें; गांवच्याच चार दोन राशीचे गहूं, जोंधळे कालविणें; केशरांत
पान:अशोक.pdf/176
Appearance