፻ዒ8 गांव-गाडा. पारख नीट होऊन, गुणी जनांना बक्षिसेंही खेड्यांपेक्षां आधिक देण्याला सवड सांपडेल. गुणोत्कर्षासाठीं सबंध तालुक्यानें वर्गणी करून शेतकाम, गुरेंढोरें, तालुक्यांत होणारीं कौशल्याची कामें ह्यांच्या प्रदर्शनाची अशा यात्रेला जोड दिली तर सिव्हिल व्हेटर्नरी (गुरांचें वैद्यक ), शेतकी, पतपेढया, ह्यांसारखीं लोकोपयोगी खातीं लोकांना जरूर तें ज्ञान देण्यासाठीं तेथें विद्वान् व अनुभवशोर लोक पाठवितील, आणि यात्रेचे आद्य हेतु उत्कृष्ट रीतीनें सफळ होतील. दिवाळी-शिमग्यांसारखे सण आणि लम्रादिवसांसारखीं कार्ये इत्यादि प्रसगांचा बाजार करण्याला खेड्यांतले लोक बहुधा आपल्या गांवच्या किंवा आसपासच्या पेठेच्या मेाठ्या दुकानीं जातात. त्यांचा सर्व व्यवहार उधारीचा असतो, व दुकानदारांना आपल्या बाक्या येण्याला पुष्कळ वाट पहावी लागते. पावसानें लागोपाठ टाळा दिला तर सर्व बाकी वसूल होणें दुरापास्त होतें, इतकंच नव्हे तर कधीं कधीं तिची आशाही सोडावी लागते. तेव्हां गांवढेक-यांना स्वस्त दरानें माल मिळणें एकीकडेच राहिलें, पण आत्मसंरक्षणासाठीं दुकानदार वेळेवर मालाच्या किंमतीच्या दुपटीच्याही रकमा नांवें मांडून ठेवतात. घी नो पैसा आणि पैशानु घी, हा अनुभव खेड्यांत सर्वत्र आहे. माल मिळतो तोंपर्यंत आपल्या खात्याची स्थिति काय आहे ह्याचा विचार करणारे लोक खेड्यांतील लिहितां वाचतां येणा-यांमध्यें देखील विरळा. मग निरक्षरांचें नांव कशाला ? त्यांनीं आठवण ठेविली तरी एक लिखा आणि दस बका, अशी अवस्था होऊन शेटजीच्या वहीपुढे गप्प बसावें लागतें. शेटजीचा एकच मंत्र * नीट आठवण कर. हें लिहिलें तें खेॉर्ट का ? दाखीव कोणालाही वही ?. असल्या बोलाचालींत दुकानांत जमलेले लोक गि-हाइकालाच फजीत करतात. खात्यांत वाटेल त्या रकमा व भाव घुसडण्यांत आणि दिलेला वसूल तोंडांत टाकण्यांत दुकानदाराचें इमानच काय त्याच्या लेखणीच्या आड येईल तेवढें. दुकानदार शेंकडा पंचवीसच्या कमी नफ्यानें माल मुळांत विकीत नाहीत, आणि त्यावर हैं हिशेबाचें भोळे असतं. ह्याचा
पान:अशोक.pdf/175
Appearance