Jump to content

पान:अशोक.pdf/173

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

8ሄዳቑ गांव-गाडT. वर्गणी गोळा करणारे इसम बहुधा गांवचे पुंड असतात. आपसांतलें खासगी वांकडें उगविण्याला आणि लोकांच्या पैशावर हौस पुरविण्याला यात्रा ही संधि चांगली असते. वर्गणी देण्याला आढेवेढे घेणें म्हणजे चारचौघांत मानखंडणा करून घेणें असें लोकांना वाटतें. म्हणून ज्याला माणूसबळ व द्रव्यबळ कमी अशा लोकांना, विशेषतः बायाबापड्यांना, आपल्या ऐपतीबाहेर यात्रेची वैर्गणी द्यावी लागते, आणि पुढाईत पुंड व त्यांच्या पुठ्ठयांतील मंडळी अजिबात कोरी राहते, किंवा अल्पस्वल्प वर्गणीवर सुटते. जमलेल्या वर्गणींत हे उजळ ठक मौज मारतात, आणि बचत तोंडांत टाकतात. त्यामुळे हे गावक-यांना चढ देतात, आणि नव्यानव्या यात्रा भरवितात. काढ हुडकून जुनें देवीचें किंवा खंडोबाबहिरोबाचें देऊळ, किंवा दरगा, अगर मशीद; अथवा एखाद्या बुवाची समाधि किंवा फकिराचें थडगें; किंवा वर्सीव आणन एखादा नवा साधु आणि भरीव यात्रा; व उकळ वर्गणी, हा ह्यांचा रोजगार. कोठं बसा कलभंडाशीं झगडत, असा विचार करून भिडस्त गांवकरी भिण्याभावें किंवा भक्तिभावें यात्रा भरविण्याला होकार भरतात. ह्याचा परिणाम असा झाला आहे कीं, घाटावरील गांवांत यात्राच यात्रा बोकाळल्या आहेत. आठवडाबाजारांपेक्षां यात्रांमध्यें लांबलांबचे दुकानदार येतात, आणि ते टाकाऊ, भेसळीचा माल आणतात, व कसरीचीं वजनें, मापें वापरतात. आठवडाबाजारांतले दुकानदार व गि-हाईक ह्यांची ओळख असल्यामुळे एका बाजाराला फसविल्यास दुस-या बाजाराला ती गोष्ट गि-हाईकाला दुकानदारांच्या आंगीं लावतां येते. यात्रांमध्यें तशी स्थिति नसते. यात्रा करणा-या दुकानदारांत हलकटांची संख्या अधिक असते. इमानेंइतवारें सालभर मेहनत करणें ज्यांना आवडत नाहीं, असे लफगे लोक कांहीं तरी वेडावांकडा माल, मिठाई, कपडे, यात्रांत विकून आपली सालचंदी काढतात. दंडेल, ठोकेभाई व आसमंतांतील हक्कदार यात्रांत फार लोटतात. बिचारा कुणबी म्हणेल कीं, मी आपला माल