R दुकानदारा. ፻'ዳጄ देवाच्या किंवा सत्पुरुषाच्या उत्सवानिमित्त यात्रा असली आणि देवा लयाचा अधिपति ऐपतदार असला, तर यात्रेला जे दुकानदार येतात त्या. त्याला शिधा दाणाचारा पोंचवावा लागतो, जेवावयास बोलवावें लागतं, आणि त्यांचा कांहीं मान ठरलेला असला तर त्याप्रमाणें नारळ, धोतरजोडा, पागोटें किंवा रोकड देऊन त्यांची मानसंभावना कशुद्धी लागते: आणि जे वारकरी, गोसावी, बैरागी, साधू, फकीर विकल वगैरे भिक्षुक येतात त्यांचाही ह्याप्रमाणें समाचार घेऊन खेरीज दक्षिणा, तंबाखू, गांजा, अफू, द्यावी लागते; व हे संतही कैफ हकानें धर्म म्हणून मागतात. यात्रेचें आधिपत्य सबंध गांवाकडे असलें, तर गांवकरी आपापसांत वर्गणी करून वरील खर्च भागवितात. ह्याप्रमाणें वहिवाट वर्षानुवर्ष चालू आहे. गांवाकडे आधिपत्य आहे अशाच यात्रांची संख्या फार असल्यामुळे, आणि गांवक-यांच्या पाहुणचाराबद्दल त्यांना परस्थांपेक्षां दुकानदार ढळत्या भावानें माल देत नसल्यामुळे, पुष्कळ गांवांना पोकळ मोठेपणाशिवाय दुसरा तादृश फायदा नसून यात्रांमुळे बराच चट्टा मात्र लागतो. पूर्वीच्या स्वस्ताईच्या व बिगर-अबकारी काळांत यात्रांसंबंधानें दाणाचारा उपसून देणें, व तलफा पुरावणें फारसें जाणवलें नाहीं; परंतु आतां तें सर्वाना जड जार्त. शिवाय पूर्वी व्यापार संकुचित आणि प्रवास धोक्याचा व अडचणीचा असल्यामुळे यात्रेच्या दुकानदारांप्रीत्यर्थ गांवाला जो खर्च येई त्यांत जागाच्या जागीं माल मिळाला हा एक फायदाच झाला असें लोकांना वाटे पूर्वी यात्रा म्हणजे कलाकुसरीच्या मालाचें किंवा कलावान् लोकांच्या कौशल्याचें प्रदर्शन असे. आतां ह्या गोष्टी यात्रांपेक्षां किती तरी व्यवस्थितपणानें फार झालें तर १० - २० कोसांच्या अांतील कसब्यांत किंवा शहरांत पाहण्यास मिळतात. व्यापार वाढल्यामुळे आतां गांवोगांव दुकानें झाली आहेत; आणि सडका, पोलीस वगैरे व्यवस्था झाल्यामुळे वाटेल तेथून माल आणणें कठीण नाहीं. तेव्हां यात्रेच्या दुकानदारांच्या बळवणीचें ओझें गांवानें उचलण्याचें कारण आज घटकेला उरलें नाहीं; आणि भिक्षुकी संत-विकलांचें पोट व निशाबाजी चालविणें म्हणजे शुद्ध
पान:अशोक.pdf/172
Appearance