Jump to content

पान:अशोक.pdf/171

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५० गांव-गाडा. वळूघोड्यांना घास शेतकरी स्वतः पुरवीत नाहीत, तो ते वाणी व मुसलमान अडत्यांमार्फत विकतात, आणि अडत्यांना विशेष तकलीफ न पडतां शेंकडा ४० - ५० अडत मिळते, अशा मतलबाचा पत्रव्यवहार शेतकरी मासिक पुस्तकांत प्रसिद्ध झाला आहे. आठवडाबाजारांत महारजागले, फकीर, गोसावी, बैरागी, वाघे, मुरळ्या, हिजडे वगैरेंची बेहद्द लुट चालते, आणि तिचा मारा कुणबी दुकानदारांवर जबर पडतो. ह्यांशीं कष्टकट घालीत बसावें, तर गर्दी पाहून गि-हाईक दुसरीकडे जातें, आपला माल पड़न राहतो, परत घरी अगर गांवीं जाण्याला उशीर होतो, आणि गांवची सोबत निघून जाते; इत्यादि विचार दुकानदारांच्या मनांत येतात. जितका दुकानदार दुर्बल व दिवाभीत तितका त्याला ब्रास व तोटा अधिक. बाजारांतल्या दुकानांना प्रशस्त जागा वांटून दिल्या, दोन दुकानांमध्यें जरूर तितकी मोकळी जागा राहिली, आयतखाऊ व आडदांड लोकांवर सत्त नजर ठेवली, आणि हक म्हणन बाजार उकळणें महार-जागले व भिकारांना बंद केलें, तर थोडक्या काळांत कुणबी दुकानदार बनेल; आणि शेतमालाचे भाव तेजीचे असून ज्या रास्त नफ्याला आज तो आंचवतेी तो त्याला मिळेल. आठवडाबाजार व यात्रा भरविण्यासंबंधानें मुंबईसरकारानें सन १८६२ सालचा आक्ट ४ पास केला आहे. त्याअन्वयें नवीन यात्रा किंवा बाजार भरविण्यास जिल्हा मॅजिस्ट्रेची परवानगी लागते. अपल्या सोयीसाठीं व व्यापारवृद्धीसाठीं लोकांनीं आपले जरुरीप्रमाणें नवीन बाजार भरावण्यास हरकत नाहीं. गांवढेक-यांचा बराच बाजार व करमणूक गांवेोगांव भरणा-या यात्रांत होते. पावसाळा संपला म्हणजे यात्रांचा हंगाम सुरू होतो. आपल्या गांवीं नवीन बाजार भरविणें झाल्यास, गांवचे लोक वर्गणी जमा करून आसपासच्या सर्व प्रकारच्या दुकानदारांना चिठ्ठया पाठवितात, आणि त्यांना शिधा, चारा देऊन वर पागोटींही बांधतात. बाजार दर आठवड्यास भरणारा असल्यामुळे दुकानदारांचा पाहुणचार थोडक्याच सुदर्तीत बंद होतो. पण ही गोष्ट यात्रांना लागू पडत नाहीं. अमुक एका