Jump to content

पान:अशोक.pdf/161

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

reరి गांव-गाडा. सांगतात कीं, निजामशाहींत भिकार ठरत नाहीं. गांवकरी व अधिकारी त्यांना झोडून पिटाळून लावतात. मोकळ्या पायाच्या इंग्रजींत तसें होणें शक्य नसव्यानें एकंदर आयतखाऊंचा प्रश्न सोडविणें कठीण आहे, व तो आमच्या लोकांच्या मायाळूपणानें अधिकच कठीण झाला आहे. प्रत्येकानें काम करावें आणि पोटाला मिळवावें. असें जो करीत नाहीं व मला पोटाला नाहीं म्हणून भीक मागण्याला येतो, त्याला भीक घालू नये. तो उपाशीं मरत असला तर त्याला काम करण्यास सांगावें, पण फुकट पोटाला देऊँ नये. तसेंच पैसा गांठीं असल्याशवाय कोणालाही भटकतां येऊं नये. अशी तजवीज झाली पाहिजे आणि हें काम लोकांचें आहे, ह्यांत व्यक्तिस्वार्त=याच्या आड येणयासारखें कांहीं नाहीं. वाटेल त्यानें वाटेल त्या साधूला किंवा साधूंच्या मेळयाला वाटेल तेथें न्यावें आणि त्यांचा खर्च सोसावा. ज्या भिक्षुकांजवळ वाटखाचीं नसेल त्यांना आमंत्रणाशिवाय 'गांवोगांव भटकतां येऊं नये, आणि ते गांवीं आल्यास त्यांना तेथें भिक्षा मिळू नये व मागतां येऊं नये. आमंत्रित भिक्षुकांची बरदस्त आमंत्रण देणाप्रांनीं करावी, इतरांस त्यांची तोषीस लागू देऊँ नये. असें झालें म्हणजे आमंत्रण देणारे अंथरूण पाहून पाय पसरतील. असले कांहीं 'सिद्धांत लोकांच्या मनांतबिंबल्याशिवाय आणि तदनुसार वागण्याचा त्यांनीं निर्धार केल्याशिवाय भिका-यांची व गुन्हेगारांची संख्या आणि देशाचें दारिद्रय हटणार नाहीं. निमंत्रण नसलेल्या साधूंच्या फिरतीवर पोलीसनें लक्ष ठेवावें आणि लोकांना त्रास होईल अशा रितीनें कोणालाही भीक माणूं देऊं नये. मुंबई डिस्ट्रिक्ट पोलीस आक्ट (१८९० चा अंक ४) कलम ६१ रकम (एस्) नुसती कायद्यांत धूळ खात पडली आहे. तिचा जर गांवांत, यात्रांत व आठवडे बाजारांत अंमल केला तर पुष्कळ साधू आणपगू दुसरा धंदा पाहतील, जो कोणी ब्रासदायक रीतानें भीक मागतो अथवा भीक मिळविण्यासाठीं रस्त्यांत किंवा रस्त्याजवळ रोग किंवा व्यंग किंवा केिळसवाणी जखम दाखवितो त्याला पन्नास रुपयेपर्यंत दंड सदर कायद्याच्या सदर कलमांत सांगितला आहे. तसेंच अठरा वर्षांचे आंतील पुरुषाला