Jump to content

पान:अशोक.pdf/158

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

फिरस्ते. १३७ रीघ नव्हती, तेथें मोठालीं भगदाडें पाडलीं, व मानधनांच्या तोंडाला काळे फांसलें. आगगाडी नव्हती तेव्हां साधू लेक पायीं प्रवास यात्रा करून ठिकठिकाणची माहिती व ज्ञान मिळवीत; आणि त्यांच्या औषधपाण्याचा व जडीबुट्टीचा लोकांना उपयोग होत असे असें म्हणतात. आतां हे लोक आगगाडीनें इकडून तिकडे जातात, व त्यांना देशाचार पाहण्यास व वनस्पतींचें ज्ञान मिळविण्यास कांहींसुद्धां संधेि सांपडत नाहीं. तरी आपले लोक अजून समजतात कीं, साधूंना किंवा त्यांच्या घरभ-या चेल्यांना पुष्कळ कळतें. कांहीं साधूंना अल्पस्वल्प शास्त्रीय क्रिया माहीत असतात. उदाहरणार्थ, कागदावर तुरटीनें गाईचें किंवा चेटकीचें चित्र काढलें तर तें एरवीं दिसत नाहीं, कागद पाण्यांत बुचकळला म्हणजे तें दिसतें व साधूचा बोलबाला होतो. झाडें,धान्याच्या सुड्या व चा-याच्या गंजा जाळण्याच्याही युक्तच्या आहेत, आणि अरिष्ट-प्रतीति आली म्हणजे लोकांना खरेंच वाटतें कीं, साधूचा शाप भोंवला. असल्या कृती शिकून आपलें ढोंग मातविण्यापलीकडे किंवा साधूंचे कपडे पांघरून गुन्हे करण्यापलीकडे बहुतेक आयतखाऊंस उद्योगच राहिला नाहीं, असें म्हटल्यावांचून राहवत नाहीं. ह्यांच्याच नांवानें तुकोबाराय हळहळतात कीं 'बुडतसें जन देखवेना डोळा । म्हणूनी कनवळा येत असे ॥” गांवोगांव भटकणा-या भिकाराचे ढोबळ मानानें तीन वर्ग पडतील. जोशी, वासुदेव, पांगूळ, भराडी, वावे, तिरमल वगैरेसारखे भिक्षुक चित्रकथी, मांगगारोडी, पारधी, माकडवाले, कैकाडी, वगैरे सारखे चोर भिक्षुक; आणि वारकरी, विकूल (आधळेपांगळे, रोगी वगैरे); गोसावी, बैरागी, मानभावू, फकीर वगेरे प्रतिष्ठित भिक्षुक. अनेक प्रकारचे गुन्हेगार कार्यभाग साधितात, आणि भिक्षेत ऊर्फ धर्मात प्रपंच भागला नाहीं म्हणजे तिन्ही वर्गातील लोक कमीअधिक मानानें लांडीलबाडी व चोरीचपाटी करतात. पहिल्या वर्गातील लोकांचीं जीं काय प्राचीन गाणी, कथा, पेोवाडे, होरे, ठोके, बाण्या असतील, त्यांचा संग्रह करून