फिरस्ते. १२५ तर राखणदाराला शेत मोकळे टाकून गांवांत कोंडवाड्यापर्यंत यावें लागतें. पाटील भेटला आणि गुरें ताब्यांत घेण्याला महार चावडीवर असला तर बरें, आणि जर कां दोघांपैकी एकाची गांठ पडली नाहीं तर तिष्ठत बसावें लागतें. इतकी फुरसत शेतक-यांला कोठ्न असणार ? आणि असली तरी नंगेसे खुदा बेजार. भिका-यांशीं अदावत करून घरादाराचा उन्हाळा होण्याची भीति असते. शिवाय भिकार जाती पोरांपासून तों म्हाता-यांपर्यंत लोंचट, बाबा करून जनावरें सोडून न्यावयाचीं. त्यांची डाळ शिजली नाहीं तर तळावरील बायका, पुरुष, कुणब्याभोंवतीं घों घौं जमतात व हातापायां पडतात. त्यांच्याही पुढे कुणब्यानें आपला हेका सोडला नाहीं, तर ते गांवच्या शिष्टांकडे जातात, आणि उलट ते कुणब्यालाच हलकट ठरवून त्याला जनावरें सोडून देण्याची गळ घालतात. कारूनारूंची व अठरापगड भिकारांचीं जनावरें बाराही महिने शेतें खात असतांना शेतकरी त्यांना कोंडवाड्यांत घालतात असें कां आढळून येत नाही, ह्यांतलें इंगित हें आहे. ज्या बायका गवतासाठीं किंवा सरपणासाठीं रान घेतात, त्या बहुधा राखणदाराचा डोळा चुकवून शेतांत घुसतात. चोरपावलाचा त्यांना बालाभ्यास असतो. त्या नसेल तेथन वाट पाडतात, व कांहीं कुपाटी काढली असल्यास ती बुजवीत नाहीत; कारण रात्रीं चोरी करण्याला ती आड-वाट उपयोगीं पडते. शेतांत आल्यावर त्यातें वाटेल तसें तुडवितात; पिकें मोडतात; बांध, पाट, आळी, ढांसळतात; गवत वेंचतांना भाजी, पाला, धान्य, फळे, ओटींत भरतात; आणि तेथल्या तेथें खाण्यासारखे असेल तें शेळीसारखे बकाबका झपाझप खातात. शेताच्या मालकाची नजर गेली आणि ती लांबून ओरडला, तरी त्यांचें हात-तोंड चालूच राहतें. जवळ येऊन तो फळे, भाजी, कणसें, परत घेऊं लागला तर त्या त्याची करुणा भाकतात, आणि नच जुळलें तर गळा काढून कपाळाला स्वतःच दगड मारून घेऊन रक्त काढतात, आणि कुभांड रचतात कीं चार ठोंबांसाठीं निमुर कुणबी जीव घ्यावयाला उठला,
पान:अशोक.pdf/146
Appearance