९२४ गांव-गाडी. हिंदुस्थानावरील मुसलमानांच्या स्वा-यांमुळे त्यांचा असा दरारा बसला आहे की, ' वरच्या भिणें घेतलें रान वाटेंत भेटला मुसलमान.' ही म्हण महाराष्ट्रांत बायकापोरांच्या तोंडात भिजत आहे. हे लोक लालबुंद, उंचे पुरे, भलेभक्कम आणि कजाग असतात; त्यामुळे ते जातात त्या गांव दिवसाढवळ्या जबरदस्तीनें शिधा, चारा, लुटतात, व बिगारीच्या गाड्या काढतात. त्यांच्या टोळीबरोबर पोलीस असतें. पण त्याची तारांबळ उडून आला पेंड कसा तरी पुढें वाटेला लावण्याविषयीं कासाविशी चालते. चालू वहिवाटोप्रमाणें भटकणाया लोकांना दर गांवीं तीन दिवस राहतां येतें. गांवच्या पाटलाची किंवा एखाद्या भरदार कुणब्याची अगर स्थानिक गोसाव्या फक्रिराची ओळख असते, अशा गांर्वी ते तळ टाकतात, व तेथून आसपासची गांवें घेतात. मुकामाच्या गांवाला ते फारसा प्रका लावीत नाहींत, आणि गांव खूष राहील असा प्रयत्न करतात, त्याच गांवीं तेंच भिकार फिरून फिरून उतरू लागलें म्हणजे असें समजावें कीं ग्रांवापासून तें नजीकचे पोलीसठाण्यापर्यंत त्यांनी वळण बांधिलें, भिकार उतरलें म्हणजे बिहार्डे म्हाता-याकोताज्यांच्या व जनावरें पोरासोरांच्या दिमतीला लावतात. जरूर तितक्या बायका सरपण व चारा गोळा करण्याला शेताशेतांनीं हिंडतात, आणि उमेदवार पुरुष व बायक काळा-पांढरीं मागण्याला निघतात. मुलें गायरानांनीं किंवा राखण कमी अशा शेतांच्या कडांनीं किंवा बांधांनीं जना आणि कधीं कधीं तर तीं स्वतःच त्यांना शेतांत घालतात, गुरेंही ओढाळ व खायखाय करीत असावयाची, त्यांनी शेतांत घुसावयाचें, शेतक-यानें हैंक हैक कराव्याचें, आणि त्यांनी तस चरण्याचा रडा लावावयाचा किंवा मुसंडी देऊन निघावयाचें, हा त्यांचा परिपाठ. फिरस्त्यांचीं गुरें बहुधा हात लागत नाहीत. यदाकदाबा.
पान:अशोक.pdf/145
Appearance