Jump to content

पान:अशोक.pdf/141

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

.गांव-गाडा ܘܪ̄ ؟ A r. * N - तडक पाण्यांत पळून जातात. पुरुष व बायका वनस्पतीचीं औषधे, भस्में, रांगोळी, सुष्या, दाभण विकतात. पुरुष शस्त्रक्रिया करतात, व तुंबड्या लावतात. पुरुष, बायका, पोरें, गांवांमध्यें भाकरी व कपडे आणि शेतांत धान्य मागतात. सर्व भटकणा-या जातींत ही जात फार साळसूद आहे, व हिच्या बायकांची पातिव्रत्याबद्दल फार ख्याति आहे. वर्षी दोन वर्षांनीं पन्नास तें शंभर गोंड लोक वनस्पतींचीं औषधे, नकली सालममिश्री, सफेत मुसळी, वगैरे विकावयास एकमेळानें येतात. त्यांच्याजवळ ३०॥४० म्हशी, १०॥१२ तट्टे राहतात. ते गांवाजवळ पालें देतात आणि माणसाजनावरांच्या पोटासाठीं शिवार उकळतात. भराडी, गोंधळी, झुरळ्या, वाद्ये, ह्यांचीं दहापांच बि-हाडें, पोत्याच्या पालांत गांवाबाहेर उतरतात. त्यांच्याजवळ तर्डे, गाई, बैल, म्हशी, टोणगे, कोंबड्या, बकरी असतात; व हीं जनावरें ते विकतात, खंडोबा, बहिरोबा, देवी वगैरे देवांचीं गाणी, पोवाडे व लावण्या ते गातात. त्यावेळीं मंडळी जमुन त्यांना पैसा दोन पैसे देत, ह्यपैिकीं कहीं बैठकीचें गायें, व तमाशा करतात. हे गांवांत व शिवारांत भीक मागतात. भराड्यांच्या बायका गोदड्या शिवतात व गोंधतात. श्रुत्ये नवरात्राच्या सुमारास येऊन घरोघर तेल, पैसे व कपडे मागतात. त्यांला बहुधा दर घरीं एक पैसा मिळतो. आराधी वर्षभर भीक मागत फिरतात. जोगतिणी देवीच्या नांवानें भीक मागतात. हिंदू हिजड्यांना जोगती म्हणतात.ते फार करून कुंभाराच्या घरीं उतरतात. ते टाळ्या पिटून अभद्र बोलतात, बायकी चाळे करतात, आणि देवीच्या नांवावर परडी फिरवून भीक मागतात. ते बहुधा दर घरी एक आणि घेतात. मुसलमान हिजड्यांच्या गुरूला 'मुंढ्या? म्हणतात. तो मुसलमान असतो. अलमगीरचा जनाना हिजड्यांनीं राखला, म्हणून त्यार्ने हिजड्यांना व मुंढ्यांना वतन करून दिलें, असें हे लोक सांगतात. हिंदूमुसलमान हिजडे आपली कमाई मुंढ्याला देतात. पोतराज महार किंवा मांग असतो. तो शेंदूर फांसून लहंगानेसून मरे आईचा देव्हारा घेऊन घरोवर फिरतो, स्वतःचे अंगावर शेंदराचा गोटा लावलेल्या आसुडानें कडाके