पान:अशोक.pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कशी सुंटून बसणार आहे इकडे बोट दाखविण्याचा ह्या पुस्तकाचा मुख्य उद्देश आहे. तें सांगोपांग, परिपूर्ण व बिनचूक उतरनें आहे, अशी घमेंड मला मुळीच नाहीं. त्यांतले विषय वाढत्या अंगाचे आहेत, आणि चौकस व चिकित्सक विद्वान् त्यांत जसजसें मन घालतील तसतसे ते वाढी लागून स्पष्टही होतील. माझी माहिती व अनुमानें चुकीचीं ठरलीं तरी खेड्यापाडयांकडे आणि रान-डोंगरांकडे सुज्ञांचें लक्ष्य गेलें हैं पाहून माझ्या श्रमांचें चीज झालें व मी मोठा भाग्यशाली आहें असें मी समजेन. अमुक एक ग्रंथावरून प्रस्तुत पुस्तकाची रचना केली असें मुळीच नाहीं. त्याचा मुख्य पाया जातीजातींच्या आबालवृद्ध स्त्रीपुरुषांशीं प्रसंगानुसार झालेले संवाद व त्यांनीं दिलेली माहिती हीं आहेत. तरी माझ्या विनंतीस मान देऊन ज्या स्थाईक व फिरस्त्या जातींच्या बंधुभगिनींनीं आपला वेळ मोडून आडपडदा न ठेवतां मला माहिती सांगितली त्यांकडे ह्या पुस्तकासंबंधानें आद्य महत्त्व येतें, आणि हें साहित्य पुरावल्याबद्दल मी त्यांचा अत्यंत ऋणी आहें. ज्या जमेदारांनी आपल्या दप्तरचे जुने कागदपत्र मला दाखविले व त्यांतील माहितीचा उपयोग करण्याची परवानगी थोर मनानें दिली, त्यांचाही मजवर फार मोठा अनुग्रह झाला आहे. पुस्तकांतील अनुमानांबद्दल व सिद्धांतांबद्दलही उभय वर्गातील मंडळींनीं मजवर थोडे फार उपकार केले आहेत. परंतु त्या बाबतींत मला आधक साह्य देशी-परदेशी ग्रंथकारांचें झालें. त्यांत प्रमुखत्वें मे. स्पेन्सर,मेन, मोलस्वर्थ, बेडन पॅॉवेल, ग्रँडडफ,लिवार्नर,नेर्न, एंथोव्हेन,ऑर, मैंक्नील, सेडन ( माजी दिवाण बडोदें ), कीटोंग, सिमकॉक्स, केनडी, फडनीस, दांडेकर, मुजुमदार, पारसनीस, काथवटे (श्री. वि.) इत्यादि सरस्वतीभत; गॅझेटिअर्स, खानेसुमारासारखे रिपोर्ट, एथ्नॉंग्रफिकल सव्र्हेचे मोनोग्राफ्स आणि इतर सरकारी, खासगी, प्रसिद्ध झालेलीं पुस्तकें, व लेख ह्यांची गणना होते. ह्या सर्व विद्वचमूला मी कृतज्ञतापूर्वक धन्यवाद समर्पण करतों. रा.रा.वामन गोविंद् काळे एम. ए. इतिहास व अर्थशास्त्र ह्यांचे प्रोफेसर, फर्ग्युसन कॉलेज पुणे, ह्यांनी पुस्तकाची हस्तलिखित प्रत [ "t