पान:अशोक.pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अशोक. [ प्रकरण आहे असे दिसतें. सीलेनचे बिशप् व बौद्धधर्मावर ग्रंथ लिहिणारे प्रसिद्ध कोपल्टन् साहेब लिहितात – ‘“ 'The genius of Indian nations seems to have been at all times Avense to history. ११ प्रकरण दुसरें तत्कालीन भरतखंडाची स्थिति. त्रि० श० पूर्वी ५ व्या शतकांत भरतखंडांत एक प्रचंड धर्मक्रांति करून सोडणारा पुरुष होऊन गेला. त्याचे नांव धर्म आणि शाक्य गोतम. यासच पुढे बुद्ध झणू लागले. समाजत्याच्या हातींत त्याने आपल्या धर्माचा प्रसार हिंदु- स्थानांत चोर्वेकडे केला होता; परंतु त्या धर्माचीं सुॐ अद्यापि लोकांच्या अंतःकरणप्रदेशांत खोल जाऊन बळकट झाली नव्हती. इतक्यांत बुद्ध मरण पावला. त्याच्यामागे त्याच्या शिष्यांनीं आपल्या गुरूचे व्रत कांही दिवस बच्याच नरात्रे चालविलें होते; परंतु माकुंतला मेरू गळून पडला तृणजे इतर मणि जसे विस्कळित होतात, त्याप्रमाणे बैौद्धांच्या संघशक्तीचा मुख्य मेरू गोतम हा जातांच, बाकीचे मणी अस्ताव्यस्त होऊन पडल्याकारणानेत्यांच्यातला जोर कमी झाला होता व मतभेद आणि परस्परविरोध यांचे प्राबल्य होऊन, भिन्न भिन्न संप्रदाय आणि पंथ निर्माण होऊ लागले होते. इकडे हिंदू समाजांतल्या लोकांच्या आचारविचारांत दिवसेंदिवस विलक्षण अंतर पडत चाललं होतं. धर्मशास्त्र आणि रूहि यांच्यातलें द्वंद्व आतांच्या सारखें तेव्हांही सुरू होत. धर्मात असावयाचे एकआचरणांत दिसावयाचे दुसरें, आणि तोंडानें प्रतिपादावयाचे तिसरेंच, असा हवींच्या काळी दिसणारा प्रकार तेव्हांही होता. क्षत्रियकुलाचा प्रायः लोप होऊन त्यांची जागा शूद्रांनी (पटकाविली होती. नंदराना शूद्र होता. मौर्यवंशांतले सगळे राजे शूद्रच होते. क्षत्रियकुलाचा त्याप्रमाणे ज्याप्रमाणे लेप झाला होता, अस्सळ ब्राह्मणकुलालाही बौद्धधर्माचा भंगा लागल्यामुळे त्यांच्यांतलें ख़रें