बलुतें-आलुतें. ? o\9 म्हणजे ८०० वस्तीच्या गांव-महारांना दरसाल सुमारे ८५० रुपयांचें चौदा खंडी धान्य देण्याला गांव कबूल असतांही महार नाखूष. ह्या रकमेत सणावाराचीं वाढणीं,ओवाळणी, दानें, शेतांतलें गवत, सरपण, जनावरांची माती, कातढें वगेरे मिळविलें तर महारांची दोन तें तीन रुपये डोईपड़ी गांवावर बसते, असें भीत भीत म्हणावें लागतें; ह्याखेरीज चोरी चपाटी. दोन वागत्या पाटलांचा असा स्पष्ट अभिप्राय आहे कीं, जितका गांवचा वसूल तितक्या किंमतीचा हराजिनसी माल महार जागले उकळतात. चार आणे रोज देऊन सुद्धां ते शेतमजुरीला कां मिळत नाहींत ह्याचा उलगडा हा अभिप्राय प्रमाण मानला म्हणजे होतो. सन १९०५ सालीं • महार-जागल्यांच्या वतनासंबंधानें चौकशी चालू होती तेव्हां ते स्वच्छ म्हणत कीं, आम्हांला माणसीं दहा रुपये दरमहा दिला तरी परवडणार • नाहीं. टाकळीभान तालुका नेवासें येथील महारांना पांच वर्षे सास्पंड केलें; तेव्हां पुनः कामावर रुजू करून घेण्याच्या खटपटीसाठीं ते गांवक-यांना हजार रुपये देण्याला तयार झाले असें सांगतात. सन १९१२ सालीं पारनेर तालुक्यांतील वडनेर बुद्रुक ह्या गांवीं निजामशाहींतील एक महार आला, आणि त्यानें एकाचे दोन रुपये चवथ्या दिवशीं देण्याचा धंदा सुरू केला. ह्या धंद्यांत सदर गांवच्या महारांनीं ६००-७०० रुपये घातले. असो. गांवच्या कामाच्या मानानें महार जागल्यांच्या संख्येंत नुसती छाटाछाट करून हा कुणब्याचे मागचा ससेमिरा सुटणार नाहीं. महार जागल्यांच्या पोटगींत सरकारनें जी रयतेशीं सांवड किंवा सरकत केली आहे, तीच मुळीं पायाशुद्ध नाहीं. समसमान बलाबल असलें तर स्वरीखरी' पाती. कोणीकडे सर्व शक्तिमान् कसरी सरकार आणि कोणीकडे रानांत गांठलेला गैर-हिशेबी लंगोट्या ? सरकारचें काम कुलकर्णी धाकानें औगमोड किंवा पदरमोड करून त्याचा बोभाटा होऊँ देत नाहींत. हें सामथ्र्य रानगड्यानें कोठून आणावें ? राक्षस आणि ठंगू ह्यांच्या संगतीप्रमाणें ही सांवड कुणब्याच्या जिवावरचीच आहे. तेव्हां
पान:अशोक.pdf/128
Appearance