बलुतें-आलुतें. १०१ कडवळ, आंबे, पेरू, डाळिंबे, बोरें, संत्रीं वगैरे कोणताही उदीम कुणबी करोत; त्याची वाणगी सर्व कारूनारू, अलबत्ये गलबत्ये धर्म म्हणून मागून नेतात; आणि त्यांना नाहीं म्हणण्याची सोय नर्सते. सारांश, पेरणीला शेतांत पाय ठेवल्यापासून तों शेतांतलें तण, झुडपें खांदून काढीपर्यंत व बिंयांपासून तों थेट ' काशा ? ( गवताच्या मुळ्या ) पर्यंत शेतांत मागणारे उभेच. त्यांतले त्यांत रिकामटेकडे म्हणून महार-मांगांचें झट विशेष असतें. महार जागल्यांच्या जातींची संख्या सरासरी गांवच्या वस्तीच्या मानानें शेंकडा १०-१२ असते; म्हणजे कुणब्यांना शेंकडा १० वर लोक फुकट पोसावे लागतात. ही झाली महार जागल्यांच्या जातीची उघड उघड प्रातेि. ह्याशिवाय ते कुणब्याच्या मालावर यथेच्छ आडून ताव मारतात तो वगळाच. महार, मांग, भिल्लु, रामोशी वगैरे जातींचे पुरुष, स्त्रिया आणि मुलें गवत, सरपण, तरवड, बेलाशक कुणब्यांदेखत त्यांच्या शेतांतून काढतात, किंवा चोरतात आणि विकतात. मांगांचा डोळा केकताड अगर घायपातावर विशेष असतो. तें ते तसेंच किंवा चोरून नेतात व तुरळक विकत घेतात. केकताडाचीं च-हाटें होतात व त्याचें कृत्रिम रेशीम बनतें, म्हणून त्याला भावही चांगला असतो. राखणदार नसला किंवा पहाटेस गुंगला म्हणजे ह्यांचें चांगलें बनतें. बाजारांत बहुतेक गवत, सरपण चोरीचें येतें. अहमदनगर जिल्ह्यांत राहुरी संगमनेरकडे संत्रीं, डाळिंबांचे बाग आहेत. त्यांतलीं फळे महार, मांग, भिल्ल, रामोशी चोरून नेतात, असा फार बोभाटा आहे. गवतासरपणासाठीं येतांना हे लोक भलतीच कुपाटी काढून चोरवाट पाडून ' पारनेर येथे १९१०-११ सालीं पुजारी आडनांवाच्या कुणब्याच्या शेतांत रताळ्यांना खांदणी लागली, तेव्हां १०-१५ महार एकदम संध्याकाळीं शेतावर आले, व प्रत्येकीं तीन चार शेर रताळीं घेऊन गेले. सदर सालीं पिकावरून द्वीव गेलें होतें. सन १९१२ सालीं कडबा २०-२५ रुपये शंकडा विकत होता, आणि भर उन्हाळ्यांत १५-२० महारांनीं औष्ट्याच्या शेतांतून -रताळ्यांच्या पाल्याच्या मोटा व कडवळाचे भारे आपल्या जनावरांसाठीं आणिले.
पान:अशोक.pdf/122
Appearance