बलुतें-आलुतें. ९५ फुगत गेली असावी असें वाटतें. आतां दंगेधोपे नामशेष आहेत, आणि कचिन् झाल्यास ते मोडण्याला आणि गुन्ह्याचा बंदोबस्त करण्याला सरकारचें लष्कर व पोलीस आहेच. सरकारच्या निरानिराळ्या खात्यांनीं व सुधार णांनीं महार-जागल्यांचें काम किती कमीं केलें आहे, आणि त्यांतलेंही ते कसें चुकवितात ह्याचें दिग्दर्शन वर केलें आहे. तरी पण कामाच्या मानानें पाटील-कुळकण्र्याची संख्या ज्याप्रमाणें सरकारनें उतरावली, तशी महारजागल्यांची उतरविली नाहीं. जरूरीपेक्षां जास्त कामकरी असले म्हणजे खेळणी चालून काम बिघडतें,आणि खर्चमात्र अधिक येतो. 'रिकामा न्हावी आणि भिंतीला तुमड्या लावी,' हा सर्वानुभव महार-जागल्यांच्या संख्येला पारनेर गांवाला महार-जागल्यांचें राजरोष लष्कर ५० आहे. तें असें:-३२ महार, ४ वेसकर, ८ रामोशी जागले, २ सोनार व २ मुसलमान जागले ऊर्फ हावालदार आणि एकदोन नायकवाडी. इतके लोक तेथें शिवारांत व बाजारांत हक बेधडक उकळतात. सरसकट २५० चौरस मैल क्षेत्र व पाऊणलाख लोकवस्ती असणा-या तालुक्याला १५॥१६ मुलकी शिपाई व ३०॥३५ पोलीस शिपाई पुरतात, तर खेडयाच्या कामाच्या मानानें प्रत्येकीं किती महार-जागले लागतील हैं मुकरर करणें फारसें कठीण नाहीं. दुष्काळाच्या दिवसांत लोकांत चलबिचल व हालचाल जास्त असते, गुन्ह्यांचें प्रमाण चढतें, आणि तपासणीअंमलदारांची संख्या वाढून त्यांचा गांवगन्नां मुकामही अधिक होतो. म्हणून सुबत्तेपेक्षां दुष्काळांत गांवकोचें कागदी व पायपिटीचें काम रगड माजतें, आणि त्यांतच महार-जागले पोटामार्गे गांव सोडून जाण्याचा संभव अधिक असतो. अशा स्थितींत गांवचे किती महार-जागले डोलांत (सरकार दुष्काळांत महार१ धांदरफळ तालुके संगमनेर जि.नगर येथे लोकसंख्या सुमारें१६२५ वसूल सुमारें ३७०० रुपये असून तेथें महार १६, वेसकर *, आणि जागले ३ आहेत. ठाकुर पिंपळगांव तालुका शेवगांव जि.नगर येथें गांवाची लोकसंख्या <०० असून गांवाला ८ महार व २ कां ३ जागले आहेत.
पान:अशोक.pdf/116
Appearance