बलुतें-आलुतें. ९१ जागले करतात. जागले वतन हें अवलच्या महार वतनाचा एक पोटभाग करतां येत नाहीं. तथापि, महार मुलकीकडील व जागले पोलीसकडील तीं महार करतात व जीं पोलीसाकडून चालतात तीं जागले करतात. राज्यव्यवस्थेची सुधारणा होत गेली तसें पाटील-कुळकण्र्यांचें काम वाढलें, पण महार जागल्यांचें मात्र कमी होत गेलें. त्यांचें सर्व काम पायपिटीचें असल्यामुळे त्यांत त्यांना चुकवाचुकव करण्याला फार फावतें. शिवाय, ते पूर्वीच्या झेटिंगपादशाहींत पुरे कसून निघाल्यामुळे कामचुकार दृष्टीनें पूर्वीचें महारांचें मोठं भरंवशाचें काम म्हटलें म्हणजे शेताच्या बांधउरुळाया, भाऊ वांटण्या व वहिवाट ध्यानांत धरणें हें होय. पैमाष खात्यानें काळी-पांढरीच नकाशे तयार करवून सव्र्ह नंबर, पोट नंबर ह्यांच्या हद्दनिशाण्या कायम केल्या, तेव्हांच महारांची ही कामगिरी लोपली. शिवाय स्थावरचे कागद नोंदले जातात; आणि पीकपहाणी, बागाईत पत्रकें, खानेसुमारी वगैरे मुलकी खात्यांकडून तयार होणा-या कागदांत स्थावरच्या हकांचा पुष्कळ चांगला पुरावा रयतेला मिळतो. आतां हकनोंदणीच्या पत्रकानें सर्वांवर कडी करून बटाईपासून ता खरेदी, वांटणी, कबजापर्यंत जमिनीवरील सर्व हक नोंदण्याची तजवीज लावली आहे. पाटीलकुळकर्णी, सर्कलाइन्स्पेक्टर तों रेव्हेन्यु कमिशनरपर्यंत अंमलदारांची हद्दनिशाण्या, आतक्रमण वगैरेंवर नजर व तपासणी आहे. गांवचे नकाशे व इतर सरकारी दप्तरचे कागद पाहून तेव्हांच आतक्रमण हुडकून काढतां येतें. हद्दनिशाण्या मोडल्याबद्दल पन्नास रुपयेपर्यंत दंड व त्यांतला निमा बातमीदाराला द्यावा, असें लैंड रेव्हेन्यू कोडनें ठरविलें आहे. तरी आज नाहीत, असें म्हटलें तरी चालेल. सबब, बांधउरुळ्यांच्या कामांत सरकारला व रयतेला महारांचा व इतर बलुतदारांचा बिलकुल उपयोग उरला
पान:अशोक.pdf/112
Appearance