पान:अशोक.pdf/10

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
चक्रवर्ती राजा अशोक याचें चरित्र.


प्रकरण पहिलें.
o योग्यता. अशोकाची योग्यता. " झाले बहु. होतिल बहु ; परंतु यासम हा "---मयूरकवि. भरतखंडांतील ज्या कीर्तिमान् राजांची नांवें इतिहासांत चिरस्मरणीय होऊन राहिली आहेत, त्या सर्वांत बौद्धधर्मप्रचारक अशोकाची चक्रवर्ती राजा अशोक याचें नांव अग्रगण्य आहे. द्वापार युगांत युधिष्ठिर आणि कलियुगांत विक्रमा- दित्य, हर्षवर्धन ( शालिवाहन ) आणि अकवर येवढेच कायते सार्वभौम राजे, ह्याच्याशी तुलना करण्यास योग्य होऊन गेले. यांपैकीं युधिष्ठिरा विषयी पौराणिक कथांपलीकडे दुसरी कांहीं ऐतिहासिक माहिती उपलब्ध नसल्यामुळे, ते वगळून बाकीच्या राजांशी अशोकाची तुलना करूं लागलों, तर अशोक त्यांच्यापेक्षा अनेक पटीने श्रेष्ठ होता हे कबूल करावे लागेल. अशोकाचा पराक्रम अवर्णनीय होता, आणि त्याच्या राज्याचा विस्तारही फार मोठा होता. पूर्वेकडे बंग (बंगाल) राज्यविस्तार. आणि कामरूप ( आसाम ); दक्षिणेकडे गोदावरीचे तरि ; पश्चिमेकडे सौराष्ट्र ( काठेवाड ) आणि सिंधु- तट व उत्तरेकडे काश्मीर आणि हिमालयपर्वत अशा त्याच्या राज्यम- 1 No greater prince had ever reigned in India since the Aryans first colonised this country and no succeeding monarch excelled his glory ( R. C. Dutt's History of Civilization in ancient India) vol ii P. 2.