Jump to content

पान:अर्थ तो सांगतो पुन्हा (Artha to Sangato Punha).pdf/87

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अलीकडच्या काळात शेअर बाजारात आलेली तेजी ही माहिती, संदेश दळणवळण व करमणूक क्षेत्रातील भरभराटीमुळे होती, हे सर्वज्ञत आहे. या क्षेत्रांच्या संदर्भात काही अनुकूल उपाययोजना केल्या, तर अर्थसंकल्पातील इतर बाबी किती का क्षुल्लक असो, शेअर बाजारातील तेजी टिकून राहील अशी भाबडी आशा अर्थमंत्र्यांच्याही मनात असेल, कदाचित; बाजारातील चित्र नेमके उलटे दिसेल. वाय-टू-के यशवंत सिन्हांना चांगलाच बाधलेला दिसतो.
 (मूळ इंग्रजीवरून अनुवादित)

(२१ मार्च २०००)

◆◆

'अर्थ' तो सांगतो पुन्हा / ८८