Jump to content

पान:अर्थ तो सांगतो पुन्हा (Artha to Sangato Punha).pdf/79

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मांडला तर त्यात व्यक्तिस्वातंत्र्याचा खरा अर्थ लागेल.
 या कादंबरीत कामगारांच्या लढ्याबद्दल फार बोललं गेलं आहे. मीही वेगवेगळ्या निमित्तानं वेगवेगळ्या कामगार नेत्यांबरोबर काम केलेलं आहे. कामगारांच्या चळवळीबद्दल बोलताना एक गोष्ट विसरून चालणार नाही. एकदा दत्ता सामंतांना मी सहज प्रश्न विचारला, 'कांद्याचं आंदोलन करताना आम्ही कांद्याचा उत्पादनखर्च काढतो आणि मग मागणी करतो. तुम्ही जेव्हा संपाच्या वेळी पगार वाढवून मिळावेत म्हणून मागणी करता तेव्हा हिशेब कसा काय काढता?' दत्ता सामंतांनी उत्तर दिलं, '!!!! यांचे सगळे ताळेबंद आणि बॅलन्सशीट आम्हाला माहिती असतात. दाखवलेल्या फायद्याच्या किमान पाचपट फायदे काढतात. या चोरांना ठोकून जितकं काढता येईल तितकं काढून घेण्याचा आमचा प्रयत्न असतो.' तेव्हा, कामगार चळवळीला नावं ठेवताना लक्षात ठेवलं पाहिजे, की लायसेन्स-परमिट व्यवस्थेच्या आधारे जर का कारखानदार म्हणून मक्तेदारी मिळवली आणि तुमची पात्रता नसताना फायदे मिळवू लागलात, तर कामगारवर्ग हा एक चोरांचा गट दुसऱ्या चोरांकडून लूट काढून घ्यायचा प्रयत्न करणार आहे. तेव्हा, सगळे उद्योजक फार श्रेष्ठ आणि सगळे कामगार नेते, सगळे काका टापरे हे मात्र चुकीचे हे खरं नाही. हा धोक्याचा खेळ आहे.
 क्रांती कोण करतं? लेनिन आणि मार्क्स यांच्या क्रांतीच्या सिद्धांताची मोठी चर्चा आहे. मी नेहमी म्हणतो, की क्रांती ही शोषित करीत नाहीत, क्रांती ही सर्वांत अधिक शोषित असतात ते करतात, सर्वांत अधिक शोषित क्रांतीचे अग्रदूत असतात असं आम्हाला मार्क्सनं सांगितलं. सर्वच क्रांत्यांचा इतिहास जर आपण पाहिला तर भाकरी मिळत नाही म्हणून भुकेलेल्या लोकांनी क्रांती केलेली क्वचितच दिसते. बंगालच्या दुष्काळामध्ये भुकेपोटी कोलकत्त्यात आलेले लोक भाताच्या गोदामासमोर उपाशी मेले; पण त्यांनी धान्याची गोदामं फोडली नाहीत. क्रांती करायला माणसाला काही ताकद लागते, काही साधनं लागतात. संध्याकाळची व्हिस्की चुकली म्हणून क्रांती करणारांची संख्या अधिक आहे. क्रांती होते ती शोषक नंबर दोन जास्त वेळा करताना दिसतो. शोषक नंबर एक हा वरचा पापुद्रा काढून, खालचा पापुद्रा क्रांती करताना दिसतो. तेव्हा कामगार चळवळीला नावं ठेवताना लायसेन्स-परमिट व्यवस्थेतल्या कारखानदारीतून ही कामगार चळवळ फोफावली, ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी.

 'सामना'मध्ये निदान तीन वेळा अनंतरावांच्या तोंडी एक उल्लेख घातला आहे, 'शेवटी एक टापरे आणि शिरोळे एकत्र व्हायला लागले, तर आम्हा

'अर्थ' तो सांगतो पुन्हा / ८०