कल्पनादेखील तिला सहन होत नव्हती.
त्याचप्रमाणे, ज्या ठिकाणी मागासपणा आहे, त्या ठिकाणी महात्मे तयार होतात. दुर्दैवाने आम्ही आज इतके मागासलेले आहोत, की आमच्याकडे एक गांधी तयारी व्हावे लागतात, एक अप्पासाहेब तयार व्हावे लागतात, अशी रांगच्या रांग तयार व्हावी लागते.
एक दिवस असा उजाडेल अशी आपण आशा करूया, की ज्या दिवशी देशाला महात्म्यांपासून स्वातंत्र्य मिळेल आणि सामान्य माणसांना समान अनुभव.
व्यक्तीनं जी काही प्रगती केली असेल, ती त्यानं केलेली असते. आर्थिक महात्मे असोत का धार्मिक, आध्यात्मिक महात्मे असोत यांनी सर्व समाजाला चुकीच्या दिशेने हाकारले आणि व्यक्ती आपापल्या छिद्रातून पाहता पाहता, चुका करत, पडत, सावरल्या, पुन्हा पुढे गेल्या. त्यांच्यामुळे मनुष्यजातीची जी प्रगती झाली ती लक्षावधी, कोट्यवधी सामान्य लोकांनी पडतपडत, पडल्यानंतर पुन्हा उठून पुढे चालून, जी स्वतःची प्रगती केली त्यातून झाली आणि ज्यांना ज्यांना आम्ही महात्मे मानले, विचारवंत मानले, ते ते सर्व मनुष्यजातीच्या प्रगतीतले अडथळे ठरले.
'सामना'मधील सामना आहे तो कोणामधला? सामना आहे तो एका बाजूला समूहवाद, ज्यात व्यक्ती महत्त्वाची नाही, व्यक्तीच्या महत्त्वाकांक्षांना स्थान नाही, समाजाला महत्त्व आहे आणि दुसऱ्या बाजूला व्यक्तिवाद – समूहवादाचा पुरस्कार करणारे पुस्तकातील अप्पासाहेब काय किंवा प्रत्यक्षातले अप्पासाहेब पेंडसे काय, दोघांचीही जातकुळी एकच. मी क्रिकेट खेळलो, चांगलं क्रिकेट खेळलो, तर त्यामध्ये कदाचित काहीतरी राष्ट्रद्रोह होतो अशी अपराधी भावना हे समूहवादी आमच्या मनात तयार करतात.
मी चांगली चित्र काढण्यामध्ये रममाण झालो, तर मी काहीतरी चूक केली असं यांनी आम्हाला वाटायला लावलं. एक पाऊल पुढे टाकून, मी आग्रहानं मांडतो, की व्यक्ती म्हणून मला जर का केवळ आळस करण्यातच स्वारस्य वाटत असेल, गंभीरपणे तर तो आनंद घेण्याचं स्वातंत्र्यदेखील मला असलं पाहिजे. आनंदाचा शोध घेताना मला एक प्राणी फक्त आनंदी सापडतो. चिखलामध्ये किंवा पाण्यामध्ये डुंबणाऱ्या म्हशीच्या तोंडावर जी तृप्तता दिसते, ती मला दुसऱ्या कोणत्याही प्राण्याच्या चेहऱ्यावर दिसत नाही. अडचण कुठे तयार होते? आळशी माणसानं उद्योजकतेचं फळ आपल्याला मिळावं अशी आशा धरली, म्हणजे खरी अडचण होते. 'मी आळसवादाचा इतका पुरस्कर्ता आहे, की त्याचा आळशीपणाच्या फळांसकट स्वीकार करायला मी तयार आहे,' असा जर वाद