हे पान प्रमाणित केलेले आहे.
उदय झाला आहे, हे नक्की. संयुक्त आघाडीचे सरकार मजबूत झाले आहे; पंतप्रधानांची प्रतिमा सुधारली आहे; वित्तमंत्र्यांबद्दल लोकांच्या मनात अपेक्षा तयार झाल्या आहेत. कदाचित बारा महिन्यांनी नव्या अंदाजपत्रकाच्या वेळी वित्तमंत्र्यांना विरोध करणे डाव्यांना आजच्या इतके सोपे राहणार नाही.
थोडक्यात, वित्तमंत्र्यांनी सुरवात मोठ्या थाटात केली आहे. एका नव्या ताऱ्याचा उदय झाला आहे. यामुळेच पोटशूळ उठून, विरोधी पक्षांनी त्यांना हाणून पाडायचे ठरले, तर हा तारा धूमकेतू ठरेल; पण आजच्या क्षणी सध्याच्या परिस्थितीत तेरा पक्षांचे कडबोळे असलेल्या शासनाच्या वित्तमंत्र्यांनी मोठे कल्पक आणि प्रतिभाशाली अंदाजपत्रक मांडले आहे.
(६ मार्च १९९७)
◆◆
'अर्थ' तो सांगतो पुन्हा / ६७