हे पान प्रमाणित केलेले आहे.
सबसिड्या व सरकारी बँकांचा वित्तपुरवठा या मार्गाने गेल्या ५० वर्षांत अनेक होतकरू छोट्या उद्योजकांचे वाटोळे झाले. छोट्या उद्योजकांचा विनाश करणारी तीच मंडळी शेतीउद्योजकाकडे हपापलेल्या नजरेने पाहत आहेत. या उद्योजकांच्या उपक्रमात यश येण्याची चिन्हे आज तरी काही मोठी आशादायक वाटत नाहीत.
(६ जानेवारी १९९७)
◆◆
'अर्थ' तो सांगतो पुन्हा / ६३