पान:अर्थ तो सांगतो पुन्हा (Artha to Sangato Punha).pdf/59

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मार्क्स आणि एंजल्स या समाजवादाच्या अध्वयूँनी काहीच केले नाही इतकी कामगिरी 'मार्क्स आणि स्पेन्सर' दुकानांनी केली, "अशी टिप्पणी प्रख्यात व्यंगकार जॉर्ज मिकत्से यांनी केली. दुकानांची जाळी विणायची अजून येथे सुरवात झाली नाही, तोपर्यंत आपला निर्यातीचा खटाटोप कधी उभा राहणार, कधी कोसळणार असाच असणार. कच्च्या मालावर प्रक्रिया करून, त्यातून काही ग्राहकोपयोगी वस्तू तयार करणे हा शेतीउद्योगातला सर्वांत महत्त्वाचा विभाग. बहुतेक नवे तरुण उद्योजक या क्षेत्रात जाण्याची धडपड करत आहेत.
 गुणवत्ता महत्त्वाची
 'खाता येईल तितके खावे, नाही त्याचा मोरंबा घालावा' चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी प्रक्रिया व्यवसायांचे स्वरूप असे होते. बाजारात न खपण्याइतके पिकले तर माल प्रक्रिया करून साठवून ठेवावा. 'Eat what you can and can what you can't' असे या व्यवसायाचे स्वरूप फार झपाट्याने बदलले. ऊस उरतो म्हणून साखरेचे कारखाने निघाले, पण लवकरच साखर कारखान्यांना पुरवठा पडावा म्हणून उसाच्या खास बियाण्यांची लागवड, कसोशीने मशागत, शास्त्रीय व्यवस्थापन, वाढता पाणीपुरवठा आणि पसरती लागवड असा मोठा पसरता कार्यक्रम हाती घ्यावा लागतो. लागवड आणि मशागत यांच्यावर ताबा ठेवल्याखेरीज चांगली गुणवत्ता सातत्याने टिकवणे शक्य होणार नाही. जॉर्ज फर्नाडिस व त्यांच्यासारख्या अनेकांना बटाट्यांच्या काचऱ्या (वेफर्स) तयार करणे म्हणजे पोरखेळ वाटतो. काचऱ्या करणे म्हणजे बाजारात मिळतील ते बटाटे घेऊन चकत्या करून मिळेल त्या तळणातून काढणे नव्हे ! तर, त्यासाठी विशिष्ट जातीच्या बटाट्यांची लागवड करावी लागते. बटाटे शेतात असताना उष्णतामान ठराविक मर्यादेत राहील यासाठी जीवाचा आकांत करावा लागतो. तर तळण्याचे उष्णतामान १८७° से. की १८७.५° से. असावे, तळणीत काचऱ्या किती सेकंद राहाव्यात, त्यात त्या किती वेगाने फिराव्यात व त्यातून त्या बाहेर पडल्यानंतर व त्यांतील स्निग्ध पदार्थ ओढून किंवा फुकून टाकावा हा एक सगळा मोठा खटाटोप आहे.
 निसर्ग देतो, अव्यापार नेतो

 आपली शेती दरिद्री आहे व मागासलेली आहे, म्हणजे येथे भांडवलाचा तुटवडा व त्याबरोबर तंत्रज्ञानाचा जुनाटपणा आहे. तरीही, निसर्गाची मेहरबानी अशी, की भांडवलसंपन्न देशातील फळांची, गुणवत्तेत बरोबरी करणारी फळे आम्ही पिकवू शकतो. फरक एवढाच, की भांडवलसिद्ध शेतीत ८० % च्या वर

'अर्थ' तो सांगतो पुन्हा / ६०