हे पान प्रमाणित केलेले आहे.
याचा कुणी उल्लेख केला नाही.
उणे सबसिडीचे भयानक सत्य बोलणे कोणाच इंडियावाल्यांना परवडणारे नाही. त्यांनी तरी का बोलावे? ज्यांच्या घरादाराची उणे सबसिडीने लूट झाली, त्यांनाच त्याची फारशी आच नाही, शेतकऱ्यांवरील उणे सबसिडीच्या लुटीतून धनदौलत, वैभव, मानमरातब इत्यादी मिळविणाऱ्या ऐतखाऊ इतरांना का असावी!
(६ सप्टेंबर १९९५)
◆◆
'अर्थ' तो सांगतो पुन्हा / ५२