कारण कॅशियर सगळे संपावर गेले आहेत.'
वरती विचारून सांगतो
माझ्या चेकवर तो स्वीकारता येत नाही. असे शाखाप्रमखांनी सहीशिक्क्यानिशी लिहून द्यावे असा मी आग्रह धरला. अद्यापपर्यंत इतक्या संपात अशी विनंती साहेबांना कोणी केलेली नसावी. दुसरा कोणी ग्राहक असता तर त्याला त्यांनी सरळ आणि सहज उडवून लावले असावे. काउंटरपाशी उभे राहून, मी हुज्जत घालत असताना दर मिनिटा, दोन मिनिटाला कोणी ना कोणी ग्राहक बँकेच्या दरवाजातून आत येत होता. काउंटरवरची सामसूम आणि सुनसुनाट पाहिल्यावर 'आज पुन्हा बँकेत संप आहे वाटते!' असे म्हणून तोंड वाकडे करून निघून जात होता, अधिकाऱ्यांकडे कोणतीही तक्रार न करता अटीतटीला पडलेला मी एकटाच होतो.
चेक वटवता येत नाही हे लिहून द्या, ही मागणी ऐकून शाखाप्रमुख अडचणीत पडले. 'वरच्या ऑफिसरला फोन करून विचारतो,' म्हणाले, 'चाकणमध्ये फोन व्यवस्था आहे. नव्याने S.T.D व्यवस्थाही चालू झाली आहे. गावात फोन नसता किंवा बँकेचा फोन बंद असता, तर साहेबांनी काय केले असते कोण जाणे! साहेबांनी पुण्याच्या प्रमुख कार्यालयास फोन लावला. मध्यंतरी मी काउंटरपाशी उभाच. लोक सतत येत होते. काम बंद पाहून परत निघून जात होते. साहेबांचा ट्रंककॉल काही लागेना.
बँकेच्या शेजारच्या इमारतीतील सामानाच्या वखारीचे मालक बँकेत डोकावून गेले. मला नमस्कार करून हालहवाल विचारते झाले. मी सत्याग्रह करून बसलो आहे, याचे त्यांना काही आश्चर्य वाटण्याचे कारण नव्हते, चाकणभर मला ओळखतात. वखार मालकांनी बँकेच्या साहेबांपुढे एक प्रस्ताव मांडला. साहेबांना का खोळंबवता? तुमचा ट्रंककॉल कधी लागायचा? माझ्या वखारीत या, माझ्या खर्चाने S.T.D कॉल लावा. साहेब प्रस्ताव मान्य करतील असे मला वाटले नव्हते. S.T.D कॉलचे पैसे अर्थात द्यावे लागणार नव्हते; पण आगाऊ ग्रहकाला परस्पर अद्दल घडवण्यासाठी टेलिफोन बांधवांची दिरंगाई साहेबांना तशी सोयीस्कर होती. त्यांनी वखारीत जाऊन फोन करण्याचे मान्य केले. साहेब गेले, मग बाकीच्या अधिकाऱ्यांना माझ्याकडे लक्ष देण्याचे काही कारण नव्हते. मिनिटामागून मिनिटे गेली. अर्धा तास होऊन गेला. पुण्याचा फोन लागला; पण पुण्याच्या कार्यालयातील उच्च अधिकारी जागेवर नव्हते, पुन्हा एकदा फोन वाजला; पण निर्णय काही मिळाला नाही. कदाचित् पुण्याच्या