Jump to content

पान:अर्थ तो सांगतो पुन्हा (Artha to Sangato Punha).pdf/115

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आणि शेतकरी वाऱ्यावर पडले. अनधिकृत वित्तीय संस्थांचा म्हणजे सावकारांचा कारभार चालूच राहिला आणि आजही शेतीला होणाऱ्या वित्तपुरवठ्यातील मोठ्या हिश्श्याचा स्रोत या संस्थाच आहेत. आजच्या घडीला जातीय विद्वेषाची आणि सावकारविरोधी जुन्या विखाराची आग भडकवण्याची गरज आहे का? का शेतीकर्जाच्या व्याजदराबाबत तर्कसंगत आणि स्थानीय तोडगा शोधायला हवा?

(२१ जानेवारी २००६)

◆◆

'अर्थ' तो सांगतो पुन्हा / ११६