पान:अर्थाच्या अवती-भवती.pdf/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
एकोणिसाव्या शतकातील आर्थिक उदारमतवाद
आणि तत्कालीन भारतीय आर्थिक विचारधारा

 निरंकुश धोरण व उदारमतवादी विचारधारा ही व्यापारवादी विचारधारेचे अभिन्न अंग आहे. आतापर्यंत कोणत्याही राष्ट्राची व्यापारनीती ठरविताना या पद्धतीला अधिक महत्त्व दिले गेले आहे. राष्ट्राची व्यापारनीती, उद्योगनीती व इतर धोरणे ठरविताना मालाची आयात-निर्यात, उद्योगात व कृषी क्षेत्रात गुंतवणूक पूर्णपणे मुक्त असावी की, त्यावर राष्ट्रीय हितासाठी काही निर्बंध घालावेत ह्या मूलभूत प्रश्नांचा निर्णय करणे आवश्यक असते. ही विचारधारा एकोणिसाव्या शतकात बरीच गाजली. वित्तीय युद्धोत्तर काळात मात्र ह्या विवादाचे निर्णायक उत्तर मिळाले असून ते निश्चितपणे औद्योगिक रक्षणाच्या बाजूने प्रवाहित झाले आहे. १९८५ नंतर पुन्हा निरंकुश धोरणाने जोर धरला आहे. एकोणिसाव्या शतकातील निरंकुश धोरण व भारतीय विचारधारेतील हेच धोरण व मुक्त व्यापारासंबंधीचे विचार या निबंधात मांडलेले आहे.
एकोणिसाव्या शतकातील निरंकुश धोरण
 अ‍ॅडम स्मिथ व त्यांचा शिष्य परिवार हा आर्थिक व्यवस्था ही एका अदृश्य हाताने आपोआप नियंत्रित केली जाते, असे ते मानीत असत. स्मिथच्या 'स्वहिताच्या' सिद्धांतावर त्यांचा दृढविश्वास होता. स्वतःच्या

तत्त्वावर मनुष्याची वर्तणूक अवलंबून आहे आणि त्यानुसार उपभोगाच्या,

अर्थाच्या अवती-भवती । १०