पान:अर्थाच्या अवती-भवती.pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 पुस्तकातील पहिल्या विभागांमध्ये प्रमुख आर्थिक, राजनैतिक आणि कायदेशीर मुद्द्यांचा उहापोह केला आहे. म्हणजे विकसनशील देशांमध्ये खाजगीकरणाबद्दल चर्चा केली आहे. दुसऱ्या विभागात नियोजनाच्या निर्णायक घटकांची चर्चा आहे. या विभागात खाजगीकरणाचे मूळ आधार स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. तिसऱ्या विभागात विकासाच्या संदर्भात विचार व नियोजनाचे परिक्षण केले आहे. चौथ्या विभागात विकसित व अल्पविकसित देशांच्या संदर्भात विकासाकरिता खाजगीकरणाचे अध्ययन केले आहे. पाचव्या विभागात खासगीकरणाची स्थिती व सहाव्या विभागात खाजगीकरणाला यशस्वी करण्याचे उपाय, काही संकेत व गोषवारा दिलेला आहे.
 खाजगीकरणाची सर्वाधिक प्रखर मांडणी थंवर ब्रिटिश सरकारने केली आहे. थंवर सरकारच्या दृष्टीने खाजगीकरणाचे दोन फायदे आहेत. एकतर त्यामुळे क्षमतेत वाढ होईल आणि दुसरे म्हणजे उपभोक्त्यांचा लाभ वाढेल. इटालियन सरकारने शेअर्स त्यांच्या जनतेला विकून, त्यांच्या आय.आर. आय. ह्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीला येणाऱ्या कोट्यवधी डॉलर्सचा तोटा भरून काढण्याकरता हा प्रयत्न केला. फ्रान्स सरकारने नोव्हेंबर १९८६ मध्ये खाजगीकरणावर भर दिला. टर्की, कॅनडा या देशांनीसुद्धा आपल्या परीने खासगीकरणाकरिता प्रयत्न केले.
 मागच्या तीन वर्षांपासून अल्पविकसित आशियाई देशांमध्येसुद्धा विचार विमर्श करत आर्थिक सहाय्य मागून खाजगीकरण वाढविण्यात उत्साह दिसून आला आहे. काही अपवाद सोडले तर विकसनशील देशात बहुतेक खाजगीकरण मागे पडण्याचे कारण भांडवलाची कमतरता आहे. दक्षिणपूर्व आशियातील देशांमध्ये आधुनिक वित्तीय संस्थांचा विकास करून खाजगीकरणाला उत्तम प्रतिसाद मिळाला. मलेशियाला खाजगीकरणामध्ये विशेष रुची आहे. थायलंडने दूरध्वनी व्यवस्थेत, रस्ते, रेल्वे इत्यादी क्षेत्रांमध्ये खाजगीकरण केले आहे. मात्र, या देशाला हवा तितका चांगला प्रतिसाद मिळाला नाही.
 बांगलादेश सरकारने ज्युट मिल्स चालविण्याचा अधिकार आता लोकांना दिला आहे. जपानसारख्या देशांनी सार्वजनिक लघुउद्योगांच्या हिस्सा कमी करून आंशिक हिस्सा खाजगी भांडवलाला दिला आहे. निपॉन डाक्तार व्यवस्था याचे चांगले उदाहरण आहे. समाजवादी चीननेसुद्धा शेती व उद्योगात या दिशेने बदल केलेले आहेत.

 चिली व लॅटिन अमेरिकन देशांनी संरक्षण विभागसुद्धा खासगी क्षेत्रात घेतला आहे. तसेच मेक्सिको, अर्जेंटिना, जमौका इत्यादी देश खाजगीकरण करत आहेत. आफ्रिकी देशांमध्ये सहारा, नैरोबी, अबिडजन, हजारे यांना सोडल्यास

अर्थाच्या अवती-भवती । ५०