पान:अर्थाच्या अवती-भवती.pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भेद करता येणार नाही. २) देशी व विदेशी वस्तुमध्ये भेद करायचा नाही. ३) अमेरिकेबरोबर जर द्विपक्षिय व्यापार चालत राहिला तर युद्धसामुग्रीकरिता त्या देशाला Must travored Nation Clame अंतर्गत आणण्यात येईल.
 भारतीय श्रमशक्तीवर बराच परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण लेबर सव्हिस ही एम.एन.सी. प्रमाणे आपण दिली नाही तर विदेशी श्रमिक येणार आणि त्यामुळे आपली बेरोजगारी वाढणार. कारण आजही आपल्या देशात अकुशलता व अज्ञानता आहे. कोणतीही शक्ती एम.एन.सी.मध्ये नोकरी करण्याच्या इच्छेने येऊ शकेल. त्याचेही वर्गीकरण केले जावे. जसे कुशल व अकुशल वगैरे. त्याला national intigration la अंतर्गत ठेवले आहे. या प्रस्तावात तिसऱ्या जगाच्या श्रमिकांना पहिलेत वर्गीकृत करुन ठेवले आहे. आपले शिक्षित लोक अधिक बुद्धीमान, कुशल आहेत. परंतु तिसऱ्या जगाचे देश म्हटले की त्यांना कमी लेखण्यात येणार. उदा. एशियन टायगर, सिंगापूर, इंडोनेशिया, लॅटिन अमेरिकन देश, ब्राझील, मेक्सिको यात काम करणारे तिन चतुर्थांश लोक आहेत. गॅटच्या गुरुगव्हेपासून चालणारे दोन प्रमुख मुद्दे. TRIP (Trade Related to intallactule Propet) बौद्धीक संपदाचा व्यापार. याचा संबंध पेटंटशी आहे. या पेटंटची कल्पना १९८३ मध्ये झालेल्या पॅरिस परिषदेतून मांडली. या उत्पादनाचा उत्पादक माल काढून एकाधिकार स्थापित करेल, ते पेटंट म्हणून समजले जाईल. त्याच्या बौद्धीक प्रयत्नांचा त्याला मोबदला मिळेल. या पेटंट अ‍ॅक्टमध्ये उपभोक्त्याची काय भूमिका व आवड राहील याबद्दल काहीच सांगितले गेले नाही. भारताने १९७० साली स्वतःचा पेटंट अ‍ॅक्ट तयार केला. या अ‍ॅक्टमध्ये एकाधिकाराला प्रोत्साहन मिळू नये याची तरतूद केली. खासगी क्षेत्र वाढू नये ही अट होती. या अ‍ॅक्टचा फायदा फार्मास्युटिकल कंपन्यांना झाला. औषधांच्या किंमती १९७० पर्यंत जगात बऱ्याच होत्या. औषधे साधारण व्यक्तीला घेता येणे परवडणारे नव्हते. ती औषधे स्वस्त दरात मिळू लागली. परंतु गॅटचा आग्रह होता की, भारताने त्यांचा पेटंट अ‍ॅक्ट रद्द करुन बहुराष्ट्रीय कंपन्यांचा अ‍ॅक्ट अंमलात आणावा. असे केले असते तर भारतातील किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या असत्या आणि उपभोक्त्याला त्या महागात पडल्या असत्या.
 गॅट व बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या मते, UDCS च्या वस्तू व सेवांच्या किंमती तर वाढल्याच आहेत. शिवाय गरीबी, बेकारी ही समस्याही वाढतच आहे. एकूण जीडीपी कमीच आहे. म्हणून हा ड्राफ्ट मान्य करुन शिथिलीकरण पद्धती अवलंबा.

 TRIM - (Trade Releted Investment Measeres) गुंतवणुकीसंबंधी

अर्थाच्या अवती-भवती । ४५