पान:अर्थाच्या अवती-भवती.pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बरोबर आहे किंवा नाही हे ठरविण्यासाठी TPRM (Trade Policy Riview Mechanism) स्थापित करण्यात येईल. यावरुन असे लक्षात येते की, एम.टी. ओ., गेट व अमेरिकेने मिळून अल्पविकसित देशांच्या व्यापाराकरिता बरेच कडक नियम करुन त्यांच्याकरिता कोणतीच शिथिलता सांगितलेली नाही. गॅटने हा प्रस्ताव मांडल्यावर गॅट निगोसियेव्हस या नावाने याला ओळखले जात होते. १९९० साली ब्रुसेल्स येथे जे चर्चासत्र आयोजिले होते ते यशस्वी झाले नाही. जानेवारी १९९१ साली जिनेव्हात चर्चासत्र झाले त्यात शेतमालासंबंधी चर्चा व अर्थसहाय्य याबाबतीत अमेरिका व युरोपचे मतैक्य झाले नाही. १९८६ पासून या ड्राफ्टच्या सातवेळा विचारफेऱ्या झाल्या आहेत. परंतु अमेरिकेने अर्थसहाय्य करमी करण्यासंबंधी युरोपने मान्यता दिली नाही.
 अल्पविकसित देशांच्या विचारांना विशेष महत्त्व दिले गेले नाही. परंतु, १५ डिसेंबर १९९३ पर्यंत प्रत्येक देशांना त्यांचे विचार कळविण्याची संधी दिली होती. अजूनही ठाम निर्णय झालेला नाही. परंतु, डंकेल प्रस्तावाप्रमाणे जसेच्यातसे अर्थसहाय्याचे स्वरुप मांडले गेल्यास आपल्या सारख्या सर्व अल्पविकसित देशांवर आणि गरीब शेतकऱ्यांवर परिणाम वाईट होणार हे निश्चित. विकसित देशांनी मुक्त व्यापाराच्या आधारे भांडवलप्रधान वस्तु व सेवांकरिता GATS (General Agrement on Trade in Service) याला प्राधान्य देण्याचे सुचविले व त्यात शेतीबरोबर शिक्षण, आरोग्य, पर्यटन इत्यादिबाबत सतत बोलले जात आहे. मुक्त व्यापार आणि शिथिलिकरणाची प्रक्रिया ही सैद्धांतिक दृष्टिकोनातून विकासाची प्रक्रिया आहे. कारण व्यवहारातही असे दिसून येते की विकसित देश या पद्धतीचा अवलंब करून पुढे आले आहेत. त्यांचा आग्रह आहे की, अल्पविकसीत देशांनी आता त्यांचे तंत्रज्ञान हस्तांतरणाच्या आधारावर वापरावे व विकास करावा. त्यालाच त्यांनी Transfer of Technology म्हटले आहे. आपल्याला मिळणारी टेक्नॉलॉजी जुनी आहे. मग बहुराष्ट्रीय कंपन्या व तंज्ञत्रान आपला विकास होऊ देतील का?
 GATS च्या या ड्राफ्टमध्ये आर्टिकल चारमध्ये सदस्य राष्ट्रांनी मुक्तव्यापार व प्रगतिशील शिथीलीकरणाची पद्धती अंमलात आणावी, असे म्हटले आहे. असे न झाल्यास GATS आणि MNCS चा फायदा होणार नाही. परंतु आपली संरचनात्मक व्यवस्था इतकी मागासलेली आहे की, आपण भांडवलप्रधान सेवांना आपल्या देशात आणू शकत नाही. आपल्यावर जागतिक बँकेची कर्जे आहेत. म्हणून कर्जाची परतफेड आणि मुक्त व्यापाराप्रमाणे संरचनात्मक विकास करणे कठिण आहे. डंकेल ड्राफ्टच्या झालेल्या चर्चेच्या फेरीत मुक्त व्यापार

करताना तीन अटी स्पष्ट केल्या. व्यापार करताना १) दोन देशांच्या अस्तित्वात

अर्थाच्या अवती-भवती । ४४