पान:अर्थाच्या अवती-भवती.pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
शेतकरी-शेतमजूर व उंकेल प्रस्ताव
डंकेल ड्राफ्टचा शेतकऱ्यांवर होणारा प्रभाव


Dunkel Draft HTRA GATT Photo source: hbnorg.wordpress.com 1/ या ड्राफ्टमधील विचार जुन्या पद्धतीचे आहेत. जगातील तीन अर्थव्यवस्थांपैकी भांडवलशाही W TO अधिककाळ प्रचलित चालणारी अर्थव्यवस्था आहे. अनेक देश या पावलावर पाऊल ठेवून चालत राहिले.

मात्र आता सोव्हिएट संघ विस्कळीत

होऊन चालणारा झालेला आहे. त्या प्रवासाला मेक्सिको ते मॉस्को म्हटलेले आहे. भांडवलशाही अर्थव्यवस्थेला बळ मिळाले. ऐचरियन, करीगन अर्थशास्त्रामुळे जगात विकास करुन प्रतिष्ठा वाढली. या अर्थव्यवस्थेने गरीब- श्रीमंत किंवा विकसित-अल्पविकसित देशांत दरी वाढत गेली. श्रीमंत देशांचा विकास वेगाने वाढत गेला. त्यांनी आपल्या देशात उपलब्ध साधनसंपत्तीचे विदोहन केले. त्यांच्याजवळ असलेले पेट्रोल, लोखंड, मँगनीज इत्यादी खनिजे संपत आली आहेत. आता विकसित देशांचा डोळा गरीब राष्ट्रांच्या अशा संपत्तीवर लागला आहे ज्याचे विदोहन झालेले नाही. त्या देशांमध्ये शिरण्याची धडपड सुरु आहे.
 डंकेल ड्राफ्ट याच विचारांशी जोडलेला आहे. त्याचा संबंध आंतरराष्ट्रीय व्यापाराशी येतो. याचा संबंध GATT या नावाच्या संस्थेशी आहे. जी आंतरराष्ट्रीय व्यापार कराराकरिता स्थापित केलेली आहे. ही विचारधारा अर्थशास्त्रात असलेल्या आंतरराष्ट्रीय व्यापाराशी संबंधित आहे. अर्थशास्त्राचे जनक अँडम स्थिथ यांनी ती कल्पना मुक्त व्यापार आणि डेव्हिड रिकार्डो यांनी तुलनात्मक परिव्ययासंबंधी ३०० वर्षांपूर्वी मांडली होती. याची फार जुनी ऐतिहासिक बैठक आहे. आंतरराष्ट्रीय सिद्धांत-तुलनात्मक लाभाचे तत्व-भ्रम- भांडवल व भूमीप्रमाणे विशेषिकरण यामध्ये आहे. या मुक्तव्यापार, भांडवलशाही अर्थव्यवस्थेमुळे गरीब देशांना हा व्यापार महागात पडला. १९२० पर्यंत मुक्त

व्यापाराच्या विरुद्ध वाटचाल सुरु झाली होती. १९२० नंतर समाजवादी

अर्थाच्या अवती-भवती । ४०