पान:अर्थाच्या अवती-भवती.pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

£ GBP +3.16 A super ¥ JPY A$ AUD C$ CAD +2.72 Australian doliu -1.15/-Canadian dollar -4.42/y Swedish krona +1.994Swiss franc -1.05 kr SEK Norwegian krone South Korean no UF sian ruble
 ८. लाभांशावर आयकर सूट : कंपनीद्वारा भागधारकांना दिला जाणारा लाभांश हा पूर्णपणे आयकरमुक्त असावा की नाही यावर गेली काही महिने बराच वाद चालू आहे. ही सवलत लागू केल्यास सरकारी तिजोरीचे होणारे नुकसान १०० कोटी रुपयांच्या घरात जाते. म्हणून सरकारी पातळीवरच प्रस्तुत प्रस्तावाला प्रखर विरोध होत आहे. या प्रश्नावर सरकारचे ठाम धोरण जोपर्यंत जाहीर होत नाही तोपर्यंत हा प्रश्रही भांडवल बाजाराच्या अनिश्चिततेला हातभार लावणारच.
 ९. भारतीय गुंतवणूकदारांचे आणखी एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे खाजगी पातळीवर सोने आणि चांदी यामधील गुंतवणूक हे होय. भाग-भांडवल बाजारात जेव्हा जेव्हा जास्त मंदीचे वातावरण येते तेव्हा तेव्हा हे वैयक्तिक गुंतवणूकदार सोने-चांदीत गुंतवणूक करतात व पर्यायाने उत्पादक कामाकडे जाणारा पैसा डेड इन्वेस्टमेंटमध्ये जातो.
 १०. युनिट ट्रस्ट या सरकारी वित्तीय संस्थेने जून १९८८ च्या एकाच महिन्यात युनिटस्च्या विक्रीद्वारे २ हजार कोटींच्या वर रक्कम जमा केली. हा आकडा युनिट ट्रस्टद्वारे होणाऱ्या १९८७ सालच्या संपूर्ण वर्षांच्या युनिटच्या विक्रीपेक्षा जास्त होय. अशा रीतीने युनिट ट्रस्टसमोर पैसा आहे ; पण गुंतवणूक करण्यास चांगल्या कंपन्या नाहीत, अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. युनिट ट्रस्ट या वित्तीय संस्थेने नुकताच इंडिया ग्रोथ फंड हा इश्यू ‘मेरील लिंच' यांच्या सहकार्याने अमेरिकेत सुरू केला. १२ ते १९ ऑगस्ट या दरम्यान या फंडाद्वारे ६ कोटी डॉलर्स जमा झाले. मुळात हा इश्यू १० कोटी डॉलर्स या रकमेचा होता. परंतु, जागतिक भांडवल बाजारातील मंदी लक्षात घेऊन युनिट ट्रस्टने इश्यू १० कोटी डॉलरऐवजी ६ कोटी डॉलर्स ठेवला व जेमतेम ६ कोटी डॉलर्स जमा झाले. जागतिक भांडवल बाजारात सध्या असलेली मंदी हे द्योतक आहे. जागतिक भांडवल बाजारातील घडामोडींचा प्रत्यक्ष संबंध नसतानाही भारतीय भांडवल बाजाराची परिस्थिती काही फारशी वेगळी नाही.
 ११. ग्रामीण भागातील बचतीचा ओघ भांडवल बाजाराकडे वळविण्यात अद्यापही सरकारला पुरेसे यश आले नाही. रिलायन्स पेट्रोकेमिकल्स या

कंपनीद्वारे परिवर्तनीय कर्जरोख्यांच्या माध्यमातून जो पैसा उभारला जाणार

अर्थाच्या अवती-भवती । ३८