पान:अर्थाच्या अवती-भवती.pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भारतातील भांडवल बाजाराचे बदलते स्वरूप


 भारतातील भांडवल बाजार काही वर्षांपूर्वीपर्यंत धनिक गुजराती आणि उद्योगशील पारसी यांच्या मक्तेदारीखाली होता. सार्वजनिक उपक्रम हे सर्वस्वी अंदाजपत्रकी तरतुदीवर पूर्णपणे अवलंबून होते. परंतु, वाढत्या औद्योगिकरणाबरोबर परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. भांडवल बाजाराला खऱ्या अर्थाने व्यापक आणि जनसामान्यांपर्यंत पोचविण्याचे कार्य रिलायन्स कंपनीच्या “एफ' कर्जरोख्याने केले. प्रस्तुत कंपनीच्या नवप्रवर्तक जाहिरातबाजींनी जनसामान्यांना आकर्षित केले. गोहाटी, नाशिक यासारख्या तौलनिकदृष्ट्या लहान स्थानावरून प्रस्तुत इश्युला प्रचंड प्रतिसाद मिळाला. सामान्य गुंतवणूकदार पारंपरिक बचतीचा मार्ग सोडून नवीन बचतीच्या साधनांकडे वळला आहे, हे या घटनेवरून सिद्ध झाले. १९८५ च्या काळात भांडवल बाजारात जबरदस्त तेजी आली आणि ती बरीच काळ टिकून राहिली. याच काळात सरकारने औद्योगिकरणाच्या वाढीसाठी अनेक उपायांची घोषणा केली. जनसामान्यांचे शेअर्सविषयी वाढणारे आकर्षण बघून पावसाळी छत्र्यांप्रमाणे अनेक वृत्तपत्रे प्रकाशित व्हावयास सुरुवात झाली. या वृत्तपत्रांमधून प्रकाशित होणारे व दिशाभूल करणारे अनधिकृत मूल्य हाच या नवीन गुंतवणूकदारांचा गुंतवणुकीसाठी मापदंड बनला. कालांतराने बाजारात जेव्हा पिछेहाट सुरू झाली तेव्हा या गुंतवणूकदारांना आपण फार मोठ्या प्रमाणावर फसलो गेलो असे लक्षात

AUD 2001HALAT EUR CATIODIO Photo source

www.esakal.com

अर्थाच्या अवती-भवती । ३४