पान:अर्थाच्या अवती-भवती.pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

निती, विनिमय व्यापार पद्धती आणि बाह्य कर्जे या चारही समस्या या देशांच्या आर्थिक बाजू बळकट होऊ देत नाहीत. त्यात खाजगी क्षेत्र वाढवा व विलासी वस्तूंची आयात वाढवावी या उद्देशाने आम्ही विदेशी व्यापारात आयातीत शिथिलीकरण करायला सांगितले. चलाचे अवमूल्यन करणे हा सतत टप्प्या २ ने चालवेला भाग होता. तसेच सुरुवातीपासून लागू केलेल्या अटी तर बदललेल्या नाहीतच. याशिवाय शेतीक्षेत्राचे सुद्धा स्वरूप बदलले. अर्थसहाय्य कमी करा अशी सूचना होती आणि ताबडतोब बदल quickie result सुचविले होते. या धोरणांचा शेवट असा होता."
 बुधो यांनी आपल्या लेखनात १९४४ सालापासून चालत असणारी तिसऱ्या देशांची आर्थिक कुचंबना स्पष्ट केली आहे. जो उद्देश आंतरराष्ट्रीय संस्थांचा होता. तो कधीच पूर्ण होऊ शकला नाही. प्रामुख्याने आफ्रिकी किंवा लॅटिन अमेरिकी देशांची स्थिती अधिक बिकट होण्याचे कारण या पतसंस्था आहेत,

असे खुले करून मांडले आहे.

अर्थाच्या अवती-भवती । ३३