पान:अर्थाच्या अवती-भवती.pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

'Paxatiantica and paxhoneypat' हा शब्द तिसऱ्या जगाच्या गरजा पूर्ण करण्याकरिता वापरला गेला. परंतु, सामान्य सामाजिक कल्याणाकरिता काहीच ठोस कार्य झाले नाही. तर प्रथम जगाच्या देशाच्या कल्याणात आणखीनच भर टाकण्यात आली. निरंकुश धोरणाचे राजकीय अर्थशास्त्र (अ‍ॅडम स्मिथने सांगितलेले) जागतिक बँकेकरिता मार्गदर्शन करणारे ठरले. त्यामुळे बुधो यांच्या मते, राजा आणि भिकारी यांची भूमिका जगात तयार होऊ शकली. गरीब वर्गाच्या आकांक्षा कधीच पूर्ण होऊ शकल्या नाही.
 असे सर्व घडवून आणण्याकरिता आय.एम.एफ. स्टाफ विशेष होता. त्याला मुख्य किंवा केंद्रस्थान म्हटले गेले. यात सर्व युरोप, उत्तर अमेरिकी तांत्रिक तज्ज्ञ जाणकार अधिक संख्येने ठेवण्यात आले. कोणताही निर्णय घेताना अधिक संख्येत ठेवण्यात आले. त्यात आपल्या लोकांचे अधिक मत राहील हा त्याचा प्रमुख उद्देश होता. त्यामुळे स्वतःचे (Fair and Just) चांगले प्रथम जगालाच देऊ शकले. तिसऱ्या जगाचे दबावात ठेवून शोषण केले, असा आरोप बुधो यांनी लावला आहे.
 Honey pat म्हणून तेथील IMF कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना दिलेल्या जगातल्या सर्वोत्तम वस्तू आपल्या क्षेत्रातील लोकांच्या भौतिक सुखांमध्ये वाढ करणे, भौतिक वाढ म्हणजे भौतिकवादाची पुनरावृत्ती होय. (Materialism breads materialism). असा भौतिकवाद जो मानवतेला बघत नाही किंवा अल्पविकसित देशांच्या सामाजिक न्यायाकडे लक्ष देत नाही. म्हणून हा कोष आत्मविहिन (Soulless) असे बुधो म्हणतात.
 इतकेच नाही तर १९४४ सालापासून या संस्थांचे अधिकारी सर्वोत्तम व कनिष्ठ माणूस असा फरक करीत होते. सर्वसाधारण पेक्षा आय.एम.एफ. अधिकाऱ्यांचे वागणे वेगळे होते.
 बुधो पुढे म्हणतात की, honey pat अधिक रसाळ विस्तृत माहिती अशी आहे -
 माझा स्वतःचा पगार तेव्हा १,४३,000 US होता. यात कार्यकारी प्रवासाचे भाडे व इतर लाभ जोडलेले नाहीत. बुधो यांचे कुटुंब सर्वसाधारण होते.
 समजा एखाद्या अधिकाऱ्याच्या कुटुंबात आकार मोठा असेल तर मुलांचे शिक्षण, वैद्यकीय सोयी आणि त्याप्रमाणे अधिक वेतन सुद्धा दिले गेलेले आहे. ते तिसऱ्या जगाच्या पंतप्रधान किंवा राष्ट्रपतीपेक्षाही दहापटीने अधिक होते. अधिकाऱ्यांना स्वतःच्या घरी जाताना सर्व जगातल्या सर्व सोयी-सुविधा दिल्या जात असत. तिसऱ्या देशांच्या वित्तमंत्री आणि केंद्रीय बँकांनाही हा honey pat

वेगळ्याच पद्धतीने दिला जात होता. अशा देशांच्या मोठ्या पदाधिकाऱ्यांना

अर्थाच्या अवती-भवती । २७