पान:अर्थाच्या अवती-भवती.pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असे म्हटले गेले. हे कार्यक्रम राबविण्याकरिता रचनात्मक समायोजनाकरिता कर्जे देण्यात आली. त्यात परत अवमूल्यन कर होतेच. मूल्यवर्धित कर (VAT- Value Added Tax) गरीबांना लावा, असे सांगितले. बुधो यांच्या शब्दांत 'Drink your medicin now, Trinidod IMEnd and to go, Drink now, because Tomarrow things may be made more different for you.
 Even handedness ही संकल्पना मांडण्याकरिता जमाईकीचे उदाहरण लेखकाने दिले. १९८० सालापासून दररोजच्या वाटाघाटी आय.एम. एफ.च्या चालत होत्या. जेव्हा जमाईकेची अर्थव्यवस्था फक्त एका रिकाम्या टोपलीसारखी झाली. तेव्हा आम्ही परत एक Hot Potato त्यावर टाकला. अधिकारी वर्ग आपल्या देशाची जेव्हा सत्य परिस्थिती सांगत नव्हते. तेव्हा आय.एम.एफ.च्या सदस्यांनी बँक ऑफ जमा डक तरबऱ्याच अटी लादायला सुरुवात केली. पूर्वी नमूद केल्याप्रमाणे या देशाची स्थिती ट्रीनीडॉड व टोबेगा सारखीच होती म्हणून बुधोने त्याला even mindedness म्हटले आहे. असे केल्याने कोषाचे बहुतांशी उद्देश सफल होत होते.
 २४ मे १९८९ च्या कोषाच्या कार्यकारी सदस्यांच्या सभेत असे सांगण्यात आले होते की, कर्जाची गरज असलेले सदस्य देश आम्हाला त्यांची खरी परिस्थिती सांगत नाहीत आणि सहकार्यही देत नाहीत.
 बऱ्याच देशांनी अशा कोषाच्या पद्धतीचा विरोध केला आणि या संस्थांच्या विरुद्ध पेरू, धाना, इजिप्त, तंझानिया इत्यादी राष्ट्रांच्या श्रमिक संघटनेच्या नेत्यांनी आय.एम.एफ. विरोधी चळवळ सुरू केली. लेखांच्या प्रकाशनातून जनजागृतीचे कार्य सुरू केले.
 अशी जनजागृती झाली पाहिजे आणि प्रत्येक स्त्री व पुरुषाने कोषाने तयार केलेली साखळी तोडण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे, असे बुधो यांचे मत आहे.
 १९४४ सालापासून कोषाने काढलेली पत्रके तिसऱ्या देशांचा निर्बल करत आहेत. तिसऱ्या जगाला कोणताही फायदा (मोठ्या प्रमाणात) मिळालेला नाही, असे स्पष्ट मत बुधो यांचे आहे.
 उलट कोषाच्या अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक आकांक्षा आणि शक्तींचा आनंद व भौतिक सुखांना वाढविण्याचा प्रयत्न केला गेला आहे. तिसऱ्या जगाकरिता जे बहुउद्देशीय व्यापार आणि शोधन व्यवस्थेच्या सोयी १९४४ सालापासून करण्याचे योजिले होते, त्यांना फारसे महत्त्व दिले गेले नाही. १९५० मध्ये अल्पविकसित देशांकडे अधिक लक्ष देण्याचे योजिले. पण ते कागदपत्रातच

राहिले. तिसऱ्या जगाच्या मुख्य समस्यांकडे कधीच लक्ष दिले गेले नाही.

अर्थाच्या अवती-भवती । २६