पान:अर्थाच्या अवती-भवती.pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अ‍ॅडम स्मिथचे ग्रंथ
 Theory of Moral Sentiments आणि The Wealth of Nations यांचा ठसा युरोपमध्ये उमटलेला होताच. डेव्हिड रेकॉर्डने आपले विचार मांडल्यानंतर व व्यक्तिस्वातंत्र्याच्या व नैसर्गिक तत्त्वांच्या सोबत आर्थिक मानवाची कल्पना काय असते याचा विचार सुरू झाला. स्मिथच्या Natural Theology (नैसर्गिक ब्रह्मज्ञानाच्या) विचारांना नैसर्गिक नियम म्हणून निसर्गवादाच्या विचारधारकाने पुढे आपले व व्यक्तीस्वातंत्र्याविषयी विचार मांडून सिद्धांताला बघितले तर नैसर्गिक सिद्धांताचा अर्थ व्यक्तिस्वातंत्र्य मिळावे याकरिता सरकारी कार्यावर बंधन लावणे असे आहे. इथे 'क्वॉसने' यांचे एक प्रसिद्ध वाक्य टाकल्यास स्पष्ट होईल की, निसर्गाने दिलेल्या प्रत्येक विषयाचा उपभोग घेण्याचा स्वाभाविक अधिकार प्रत्येक मानवाला या अटीवर आहे की, त्यापासून स्वतःला किंवा दुसऱ्याला त्रास व्हायला नको. याला प्रो. स्कॉट यांनी हा एक स्थायी स्वरूपाचा प्रवाह आहे, ज्याला व्यक्तीने उपभोगात आणला पाहिजे, असे सांगितले. यालाच अदृश्य हात किंवा निसर्ग असे नाव देता येईल. स्मिथचे टीकाकार कार्लाइल व रस्किन यांनी मूल्यसिद्धांत व व्यापारवादामुळे तयार झालेल्या एकाधिकारावर टीका केली. त्यांच्यामध्ये दीर्घकाळात उत्पादनाचा खर्च व खुल्या बाजारात ठरणाऱ्या किंमती यांचा संबंध लावता येत नाही. त्याला कोणत्यातरी रक्षणवादाच्या रचनेची किंवा सरकारी हस्तक्षेपाच्या गरजेची आवश्यकता भासते.
 स्मिथचा युक्तिवाद, स्वार्थ आणि सामाजिक जाणीव यावर बरीच चर्चा एकोणिसाव्या शतकातील अर्थतज्ज्ञांनी केली. असे विचार The Theory of Moral Sentiments या ग्रंथामध्ये सुरुवातीच्या वाक्यात स्पष्ट केले आहेत. परंतु, रस्किन यांनी 'अशा विचारांमुळे अर्थशास्त्र हे स्वार्थाचे शास्त्र झालेले

आहे', अशी टीका केली. अशा विचारधारेने वर्गसंघर्षाला वाव मिळतो आणि सामाजिक अर्थशास्त्राचे स्वरूप बदलते, असे प्रो. रस्किन यांचे म्हणणे होते. या सर्व बाबींवर मागील इतिहास व प्रक्रिया विश्लेषणाचा प्रभाव पडतो. समाजात वेगवेगळ्या व्यक्तिंबरोबर सहकार्याने कार्य करावे लागते. वितरण

अर्थाच्या अवती-भवती । १२