पान:अमेरिका पथदर्शक.pdf/88

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
(२)

 ३. वर्गणीद्वार:-चार आणे प्रवेश वर्गणी भरून मालेचे कायम वर्गणीदार होणारांस मालेचें पुस्तक पाऊणपट किंमतीस मिळेल.
 मालेच्या द्वितीय पुष्पांत आश्रयदाते, हितचिंतक व सहाय्यकांची नांवें प्रसिद्ध करण्यांत येतील.

 पुष्प १ लें अमेरिका पथ दर्शक प्रस्तावनाकार:-दा. वि. गोखले बी. ए. एल. एलू. बी. संपादक 'मराठा' अमेरिका जिज्ञासू, विद्यार्थी, प्रवासी व व्यापाऱ्यांस फारच उपयुक्त पृ, सं. ८० किं. फक्त ८ आ.

 पुष्प दुसरें अमेरिका दिग्दर्शनः---(छापत आहे.) प्रस्तावनाकार- श्री ज. स. करंदीकर बी. ए. एल् एल्. बी. सहसंपादक 'केसरी' ह्यांत अमेरिकन विद्यार्थी, स्त्री पुरुष, शेतकरी वगैरेचें स्वभाव धर्म, चालीरीती कर्तृत्व वगैरे संबंधीची मनोरंजक माहिती असून शिवाय अमेरीकेंतील प्रेक्षणीय संस्था व शहरांची बोधप्रद, मार्मिक व चित्ताकर्षक वर्णनें आहेत. सदरहू पुस्तकांतील विविध माहितीत उपयुक्त भर म्हणून आम्हीं पूर्वी टिळक महाविद्यालयाच्या त्रैमासिकांत प्रसिध्द केलेला व माहितीची भर घालून वाढविलेला 'अमेरिकेंतील संयुक्त संस्थानांची शासन पद्धति' हा लेख ह्या पुस्तकास परिशिष्ट रूपानें जोडला आहे. अमेरिकेंतील लोकस्थिती कळून येण्यास हें पुस्तक फारच उपयुक्त आहे. पृ. सं. सुमारें १७५ किंमत १ रु.पत्रव्यवहार खालील पत्त्यावर मराठींत किंवा इंग्रजीत करावा.

  पत्ता:---संपादक अभिनव--ग्रंथमाला, ३६८ नारायण पेठ,
         पुणें शहर.