पान:अमेरिका पथदर्शक.pdf/59

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
४६
अमेरिका-पथ-दर्शक

विद्यार्थी फार लवकर विद्या ग्रहण करूं शकतात. फ्रान्स, जर्मनी, जपान इत्यादि देशांत पहिली अडचण भाषेची पडते व भाषा शिकण्यांतच वर्ष सहा महिने घालवावे लागतात. दुसरें असें कीं, ह्या देशांतून निर्धन विद्यार्थ्यांस विद्याभ्यास करण्यास अवसर मिळत नाही. श्रीमान आईबापांची मुलेंच तेथें शिकू शकतील. अमेरिकेंत निर्धन विद्यार्थ्यांस द्रव्यार्जन करण्याची संधि मिळते.व आमचे विद्यार्थी बहुतांशी निर्धनच असतात. ह्याकरितां त्यांनीं अमेरिकेसच जाणें युक्त आहे.
 शिवाय अमेरीकेंतील विशेष हा कीं, तेथें प्रत्येक बाबतींत झपाट्याने सुधारणा घडून येत आहे. तेथें जाऊन केवळ द्रव्यार्जन करीत असतांच डोळे व कान सदोदित उघडे ठेविले, तरी बरेंच ज्ञान संपादन करतां येईल. मानवसमाजासंबंधीचे मोठमोठे महत्त्वाचे प्रश्न आज त्यांचे समोर आहेत. तेथें राहिल्याने आपलें भावी आयुष्य सुखमय करण्यास लागणारी साधनसामुग्री हिंदी तरुणांस गोळा करतां येईल. जो प्रश्न आज आमच्या समोर आहे व ज्या सामाजिक निर्बलतेचा विचार मनांत आला कीं, चित्त व्यग्र होतें, ह्या अडचणी दूर करण्याचें साधन आपणांस अमेरिकेपासूनच मिळविलें पाहिजे. तेथें राहून मी कठीणांतलें कठीण काम करूं शकेन असा आत्मविश्वास वाटावयास लागतो, त्याला स्वत:वर अवलंबून राहण्याची संवय लागते व मग त्यांस मोठमोठे प्रश्नहि गांगरून सोडीत नाहींत.
 प्र० ४९-- अमेरिकेंत कृषिविद्येचे शिक्षण मिळविण्याकरितां कोणते विश्वविद्यालय चांगले आहे?
 उ०--अमेरिकेंतील कित्येक विश्वविद्यालयांमध्यें कृषि शिकविण्याची उत्तम व्यवस्था आहे. विसकॉन्सिन (Wisconsin) विश्वविद्यालय कृषि शिक्षणाकरितां फारच चांगलें आहे. तेथील अधिक माहिती हवी असल्यास खालील पत्यांवर लिहावें:-
 The registrar,
  Wisconsin University
   Madison WIs. U.S.A.
 पश्चिम भागांतील संस्थानांत कृषि शिकविण्याची उत्तम सोय आहे.
 बर्कले येथील कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी ह्याकरितां फार चांगली आहे.
ही युनिव्हर्सिटी सॅनफ्रान्सिस्को बंदराशेजारी असून तेथें बरेंच हिंदी विद्यार्थी