पान:अमेरिका पथदर्शक.pdf/58

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
४५
प्रश्र्नोत्तरें.

सेल त्यांचा त्याग करून नवीन धार्मिक किंवा सामाजिक बंधनांचा ते स्वीकार करतात.
 प्र०४६–-अमेरिकेंत सर्व प्रकारचीं फळे मिळतात काय ?
 उ०--आंब्यांशिवाय सर्व जातींची फळे अमेरिकेत मिळू शकतात. शेव, संतरी, नाशपाती ही फळे फार चांगल्या दर्जाची भिळतात. संत्री फार गोड व बीजरहित असतात. अशा प्रकारच्या संतऱ्या ला 'नेवल' असें म्हणतात. फलाहार करून राहूं इच्छिणा-या इसमांनी अगदीं निश्चित असावे. अमेरिका फळांचे माहेर घरच आहे. तेथें कोणत्याहि संस्थानांत राहिलें तरी फळे मिळण्यास मुष्कील पडत नाही व किंमतही जवळ जवळ सर्व ठिकाणीं सारखींच पडते. आपल्या देशांतल्याप्रमाणें येथें नाही. पंजाबांत फळे रगड तर इतर प्रांतांत फळे मिळणें मुष्किलीचें होतें व फळे मिळाली, तरी फार महाग मिळतात.
 प्र० ४७--अमेरिकेतील राज्यपद्धति कशा प्रकारची आहे.
 उ०--अमरिकेच्या संयुक्त संस्थानांचीं राज्यपद्धति प्रजासत्ताक स्वरूपाची आहे. अमेरिकन लोक आपल्या प्रजासत्ताक देशाचा राजा ( अध्यक्ष ) आपणच निवडतात. कोणाहि राजवंशीय इसमांची अध्यक्षाचें जागीं निवड करण्यांत येत नाहीं. योग्यतेनुसार मोठया अधिका-यांच्या जागा देण्यांत येतात. ह्यासंबंधींची अधिक माहिती हवी असल्यास एखादे इंग्रजी पुस्तक वाचावें. प्रस्तुत स्थळीं ही माहिती अधिक विस्तारपूर्वक देतां येत नाहीं.*
 प्र० ४८--आपण अमेरिकेसच जाण्याचा आग्रह कां करितां? जर्मनी, जपान, फ्रान्स वगैरे सारख्या देशांत जाऊनहि विद्यार्जन करतां येत नाहीं काय ?
 उ०--इतर देशांतहि जाऊन आपले विद्यार्थी विद्याभ्यास करूं शकतात. आमचे विद्यार्थी जपानला जातात व एखादी कला किंवा विद्या शिकून स्वदेशी परत येतात व चैन करतात. जपानहून कित्येक तरुण शिकून आले असून गिरण्यांतून कामें करीत आहेत हे जरी खरे आहे तरी, माइया मतें, आपल्या तरुणांनी अमेरिकेसच विद्याभ्यासाकरितां जाणें अधिक श्रयस्कर आहे. कारण, अमेरिकेंत इंग्रजी भाषा प्रचलित असल्यामुळे भाषेची अडचण पडू शकत नाही. ह्यामुळे आपले


 * 'अमेरिका दिग्दर्शन 'पुस्तकांतील परिशिष्टांत अमेरिकेची शासनपद्धति देण्यांत येईल.