पान:अमेरिका पथदर्शक.pdf/56

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
४३
प्रश्र्नोत्तरें.

 प्रश्न ४२--अमेरिकेंत हिंदी स्त्रियांच्या शिक्षणाची व्यवस्था आहे काय ?
 उ०--हिंदी स्त्रियांच्या शिक्षणाची सोय अमेरिकेत कां नसावी? तेथें स्त्रियांकरितां स्वतंत्र शाळा व कॉलेजें आहेत. त्यामध्यें चार पांच वर्षे परिश्रमपूर्वक चांगलें अध्ययन केल्यानें चांगली योग्यता प्राप्त होऊं शकते. तेथें गेल्यानें हिंदी स्त्रिया ख्रिश्र्चन बनतील, असें समजूं नका; तेथें धर्म शिक्षण न देणाऱ्या बऱ्याच शाळा आहेत. तेथें सर्व जातींच्या कुमारिका विद्यार्जन करतात. अशा शाळांत शिक्षणाकरतां बरेंच द्रव्य लागतें. शंभर रुपये महिन्याच्या खर्चाला मिळाले, म्हणजे शिक्षण चांगल्या प्रकारें होऊं शकतें. अमेरिकेंत कित्येक विद्यार्थिनी स्वावलंबी बनून शिक्षण मिळवितात. हिंदी कुमारिकांनी स्वावलंबनाच्या जोरावर शिक्षण मिळविण्याच्या उद्देशानें अमेरिकेंत जाऊं नये असें माझें मत आहे, अजून मुलींना अमेरिकेत शिक्षण संपादण्याकरितां पाठविण्याची वेळ आली नाहीं, असेंहि मला वाटतें. ह्यासंबंधीं माझीं मतें निश्चित आहेत, परंतु त्यांचा येथें निर्देश करणें उचित होणार नाहीं.
 प्रश्न ४३--अमेरिकन कायदा अमेरिकन लोकांप्रमाणें हिंदी लोकांचें रक्षण करतो काय ?
 उ०--अमेरिकेंमध्यें सर्व लोकांकरितां एकच कायदा आहे. अमेरिकन कायदा कोणाचाहि पक्षपात करीत नाही. कोणाशीं तेथें तंटा झाल्यास वकीलाला जाऊन सांगावें, परंतु फी वगैरेसंबंधीं अगोदर करार करून घ्यावा.
 प्रश्न ४४--अमेरिकन लोक हिंदी मजूरांचा द्वेष करितात, व कधीं कधीं हिंदी मजुरांस मारहि देतात, असें ऐकण्यांत येतें. ह्यासंबंधीची खरी हकीकत सांगण्याची मेहेरबानी करावी.
 उ०--हें खरें आहे, अमेरिकन मजूर हिंदी मजूरांकडे तिरस्कृत दृष्टीनें पाहतात. त्यामुळें मला फार कष्ट सोसावे लागले. बरेचसे मजूर यूरोपियन असतात. युरोपियन नसले, तरी ते अमेरीकन खास नसतात. पॅसिफिक किना-यावर आमच्या लोकांना फार त्रास सोसावा लागतो. कारण तिकडे आपले चार पांच हजार लोक रहात असून ते पटके बांधतात. त्यांनी अमेरिकन टोप्या वापरल्या व अमेरिकन मजूरांप्रमाणें वागणूक ठेवली, तर तंटा सहज मिटेल, परंतु ते असें करीत नाहींत. त्यांच्या निरनिराळ्या टोळ्या शहरांत फिरत असतात, व आपल्या विचित्र वागणुकीनें त्या टोळ्या आपण हिंदू असल्याचें सर्वांच्या दृष्टोत्पत्तीस आण-