पान:अमेरिका पथदर्शक.pdf/54

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
४१
प्रश्र्नोत्तरें.

कामेंहि तेथें शिकविण्यांत येतात. ह्या विश्र्वविद्यालयांतून ‘मेकॉनिकल एंजिनियर' वगैरे पदव्या शिकून बाहेर पडणा-या यशस्वी विद्यार्थ्यास देण्यांत येतात.
 प्र० ३९--अमेरिकेंत काळ्या रंगाच्या लोकांना फार त्रास होतो, असें ऐकतों. कृपा करून ह्या संबंधींची माहिती सांगावी.
 उ०--अमेरिकेंत जवळ जवळ एक कोटी हब्शी ( Negro) लोक आहेत. जबरदस्तीनें आफ्रिकेतून धरून नेऊन अमेरिकेंत गुलाम म्हणून विकलेल्या हब्शी लोकांचेच हे वंशज होत. ह्यांची पूर्वी शेळ्यामेंढ्याप्रमाणें खरेदी विक्री होत असे. १७८३ मध्यें जेव्हां अमेरिका स्वतंत्र झाली, तेव्हां अमेरिकन लोकांना मनुष्य मात्राच्या हक्कांची जाणीव झाली व तेव्हांपासून हब्शी लोकांना मनुष्यत्वाचें अधिकार मिळवून देण्याकरितां झगडणारे लहान मोठे इसम उदयास येऊं लागले. 'काळ्यागोऱ्यांचे हक्क समान आहेत' असें प्रतिपादन करणा-यांची संख्या हळूं हळुं वाढूं लागली व अमेरिकेत काळ्या लोकांच्या हक्कांबाबत वेळोवेळीं नियम करण्यांत येऊं लागले. तरी दक्षिणेकडील संस्थानांत गुलामगिरी कायमच होती. ह्यामुळें सर्व देशांत अस्वस्थता होती व त्यामुळे काळ्या लोकांचें संरक्षण करण्याचें बाबतीत पुष्कळ झगडे उपस्थित होऊं लागले.
 सरतेशेवटीं उत्तर व दक्षिण संस्थानांमध्यें एक मोठें घनघोर युद्ध झालें. उत्तर संस्थानांचा जय झाला व हब्शी स्वतंत्र करण्यांत आले. परंतु जित संस्थानीय लोकांचें मनांत गुलामगिरीबद्दलचें पूर्वीचेच ग्रह कायम राहिले, क्रमाक्रमानें त्यांचे विचार बदलत गेले. अजूनहि उपाहारगृहांत काळ्या माणसास उपाहार द्यावयाचे नाकारतात. परंतु एकदां ओळख वगैरे झाल्यावर अमेरिकन लोक आपल्या लोकांशीं चांगल्या रीतीनें वागतात. परंतु हें मी स्पष्ट सांगून टाकितों कीं, अमेरिकेंत वर्णाचा पक्षपात फार आहे. काळ्या वर्णाच्या आमच्या विद्यार्थ्यांनी ह्या संकटाला तोंड देण्याला समर्थ असले पाहिजे. त्यांनी आपलें धैर्य कमी न होऊं देतां अमेरिकेस जाण्याचें अवश्य करावें.तेथें सामान्यतः बंगाली लोक कृष्ण वर्णाचे असतात.ते हिंमत न सोडतां अमेरिकस अवश्य जातच असतात.
 प्रश्न ४०--अमेरिकेंतील वेदान्तसभा हिंदी विद्यार्थ्यांना थोडाफार आश्रय देतात काय ?
 उ०–-होय,ह्या संस्थांपासून थोडाबहुत फायदा आमच्या विद्यार्थ्यांना अवश्य मिळेल; परंतु, अशी मदत देशप्रेमी संन्याशांपासूनच मिळविणें शक्य आहे.