पान:अमेरिका पथदर्शक.pdf/53

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
४०
अमेरिका-पथ-दर्शक

परदेशांत दुकानें उघडलीं पाहिजेत व पुष्कळ द्रव्य मिळविलें पाहिजे. असें आपण केलें, तर आपल्या मायभूमीचें थोडें बहुत पांग फेडल्यासारखें हाईल.
 प्रश्न ३६---थोड्या खर्चांत कोणत्या विश्र्वविद्यालयांत हिंदी विद्यार्थ्यांस विद्यार्जन करतां येईल ?
 उ०---सर्वसामान्यतः सर्वच विश्र्वविद्यालयें अल्प मोबदला घेऊन विद्यादानाचे पवित्र कार्य करितात. कोठें कमी कोठें किंचित् जास्त फी द्यावी लागते. पश्र्चिम भागांतील संस्थानांत फार थोडी फी देऊन विद्यार्जन करतां येतें.
 प्रश्न ३७--अमेरिकेच्या कोणकोणत्या विश्र्वविद्यालयांत पोलिटिकल ऍकानॉमी, राजकारण शास्त्र, विज्ञान (Scince) इत्यादि विषय चांगल्या रीतीनें शिकविण्यांत येतात ?
 उ०--हे विषय शिकविण्याकरतां न्युयार्क, मेडिसन बर्कले, केंब्रिज पालोआल्टो इत्यादि शहरांमध्यें चांगलीं विश्र्वविद्यालयें आहेत. ह्या विश्र्वविद्यालयांतून चांगलें विद्वान् अध्यापक वरील विषयांचें शिक्षण देतात. ह्या विश्र्वविद्यालयासंबंधीं अधिक माहितीं हवी असल्यास खालील पत्त्यांवर कार्डें टाकून माहितीपत्रकें मागवावी.
 The Registrar, University of Chicago, Chicago, U. S. A.
 The Registrar, Columbia University, New York city, U. S. A.
 The Registrar, Harward University, Cambridge, Mass, U. S. A.
The Registrar, University of California, Berkeley Cal. U. S. A.
 प्र० ३८--पिट्सबर्ग शहरी जें कार्नेजी विश्र्वविद्यालय आहे त्यांत हिंदी विद्यार्थी काय शिकूं शकतील ?
 उ०--कार्नेजी विश्र्वविद्यालयांत विद्युत, रसायन, व्यापार धातूचें पत्रें बनविणें, खनिज पदार्थ आणि आरोग्यरक्षण इत्यादि विषयासंबंधीचें शिक्षण दिलें जातें. लोहार काम, सुतार काम, एंजिन बनविणें, लोखंड वितळविणें लोखंडाचें निरनिराळ्या प्रकारचें पत्रें तयार करणे व अशाच प्रकारचीं इतर