पान:अमेरिका पथदर्शक.pdf/52

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
३९
प्रश्र्नोत्तरें.

 प्रश्न ३५---अमेरिकेंत चीनी किंवा जपानी लोक व्यापार करतात काय ? व्यापार करीत असल्यास, त्यांचें वृत्त थोडें विस्तारपूर्वक सांगण्याची कृपा करावी.
 उ०---अमेरिकेंत चिनी व जपानी माणसें निरनिराळ्या धंद्यांत गुंतलेलीं आहेत. चीनी लोक बहुधा परीटाचा धंदा करितात. अमेरिकेंत असें एखादेंच शहर असेल कीं, जेथें चिनी परीट नाहींत. थोडेसे द्रव्य घेऊन हे अमेरिकेंत जातात. स्वतःच्या कर्तबगारीच्या जोरावर श्रीमंत बनतात. त्यांच्या कोठ्या असून मोठमोठ्या शहरांतून त्यांची भोजनालयेंहि आहेत. त्या भोजनालयास ' चाप ;" हें नांव आहे. त्यामध्यें सर्व जातीचे लोक जातात व उपहार करतात. | लोकांचीं भोजनालयें फार चांगल्या प्रकारें चालतात. सॅनफ्रान्सिस्कोमधील चिनी लोक फार श्रीमंत आहेत. ह्या धंद्याव्यतिरिक्त इतर धंदे करूनहि, हे लोक आपला निर्वाह करितात. कित्येक चीनी लोक कुलीचेंहि काम करितात.

 आतां जपानी लोकांची हकीकत सांगतों. अमेरिकेंत जपानी लोक चीनी लोकांपेक्षां प्रत्येक बाबतींत पुढारलेले आहेत, ह्यांचीं दुकानें बहुतेक सर्व शहरांत आहेत. जपानी लोक अमेरिकेंत जमिनी फार खरेदी करितात; व आपल्या वसाहती निर्माण करतात. कॅलिफोर्निया संस्थानांत जपानी लोकांनी कित्येक लाख डॉलर किमतीच्या जमिनी विकत घेतल्या आहेत. हे लोक ठेक्यानेंहि दुस-यांची कामें करितात. आपल्या हिंदी लोकांप्रमाणें केवळ मजुरी करूनच हें लोक थांबलें नाहीत; उलट, हे सर्व प्रकारच्या हस्तकौशल्याचींहि कामें करितात. ज्याप्रमाणें हिंदी लोक नॅटाल, केपकॉलनी वगैरे दक्षिण आफ्रिकेंतील ब्रिटिश वसाहतीत वसाहती करून दुकानें चालवीत आहेत, त्याचप्रमाणें जपानी लोकहि अमेरिकेंत द्रव्यार्जनाच्या व्यवसायांत गढून गेले आहेत.मी आपल्या प्रवासांत त्यांच्या लहान लहान वसाहती पाहिल्या. तालुक्यातालुक्यांतूनहि जपानी लोक घरें बांधून रहात आहेत. सर्व भागांत त्यांनी जमिनी खरेदी केल्या असून जमिनीचे उत्पन्न ते शहरांत विकून पैसे मिळवितात. लासएञ्जल्सच्या सर्व बाजूंस जपानी लोकांची ते पसरलेली पाहून मला मोठें आश्चर्य वाटलें.
 माझ्या देशबंधूंनी मनांत आणल्यास त्यांनाहि बरेंच काम करितां येईल. आम्ही आपल्या देशांतून बाहेर पडून जपानी व चीनी लोकांप्रमाणें धैर्यानें