पान:अमेरिका पथदर्शक.pdf/48

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
३५
प्रश्र्नोत्तरें.

पावसाची सर आली तर आली, ह्याकरितां आमच्या बंधूंनीं जास्त थंडी सहन करण्याची तयारी ठेवली पाहिजे.
 प्रश्न २८--एखादा विषय स्वतंत्रपणें शिकावयाचा असल्यास काय करावें ?
 उ०--अमेरिकेंतहि हिंदुस्थानांतल्याप्रमाणें शिकवण्यांची (ट्युशनची) पद्धति आहे. निरनिराळे विषय शिकविण्याकरितां चांगलें तज्ज्ञ अध्यापक मिळूं शकतात.रोजची फी कमींत कमी दरतासीं १॥रुपया याप्रमाणें अध्यापकांस द्यावी लागते. कॉलेजांतहि केवळ एक विषय शिकविण्याची व्यवस्था होऊं शकते. ह्याकरितां कॉलेजच्या अध्यक्षाची परवानगी काढावी लागते. ह्याप्रकारें ज्याला जो विषय शिकावयाचा असेल, तो विषय शिकण्याची व्यवस्था लावून घेतां येतें. परंतु असल्या बाबींचा निर्णय अमेरिकेस गेल्यावर सहज करतां येईल. येथें ह्यासंबंधीं अधिक सांगणें निरुपयोगीच ठरेल.
 प्रश्न २९--अमेरिकेंतील विश्वविद्यालयाची पदवी घेतलेला हिंदी युवक हिंदुस्थानांत आल्यावर काय करूं शकेल?
 उ०--ह्या प्रश्नाचें उत्तर मी काय देऊं शकणार? हें ज्याप्रकारचे शिक्षण घेतलें असेल, त्यावर अवलंबून राहील. जो युवक ज्या विषयांत प्रवीण झाला असेल तो त्या विषयाच्या द्वारेंच आपला व आपल्या देशाचा फायदा करून देऊं शकेल. हिंदी युवकांनी अमेरिकेंत कलाकौशल्याचें शिक्षण मिळविण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. आमच्या देशांत शास्त्रीय पद्धतीनुसार इमारती बांधयांत आल्या पाहिजेत. अमेरिकेंत जाऊन कांहीं विद्याथ्र्यांनी Architecture चें शिक्षण मिळविल्यास आपल्या देशाचा फार फायदा होईल. एखाद्या यंत्राचे निरनिराळे विभाग बनविणें व त्यांचा उपयोग जाणणें किती जरूरीचें आहे बरें? आपल्याला लहान लहान किरकोळ वस्तूंकरतांहि दुस-या देशांवर अवलंबून रहावें लागतें. आम्हांस शिक्षणशास्त्राचीहि चांगली माहिती नाही.कोलंबिया विश्र्वविद्यालयांत शास्त्रीय विषय शिकविण्याच्या पद्धतीचें शिक्षण घेऊन, त्याचा आपल्या देशांत प्रसार करावयाला पाहिजे. छत्री, कागद, पेंसिल, साखर डे, प्याले, पेंचखिळे, लहान लहान यंत्रे बनविणें व त्यांचें उपयोग जाणणें इत्यादि शेंकडों गोष्टी अमेरिकेस जाऊन शिकतां येतात. कृषिविषयक शास्त्रीय शिक्षणाचीहि आपल्या देशांत कितीतरी जरूरी आहे. अमेरिकेंतील कृषिमहाविद्यालयात भरती होऊन आम्ही कृषींचें उत्कृष्ठ शिक्षण मिळविलें पाहिजे; व